ठाणे : ठाणे, मुंबई, नवी मुंबई सारख्या शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. बेकायदेशीर प्राणघातक शस्त्राच्या धाकावर नोंद होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करीत मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत पोलीस पथकाने दोन आरोपींना अटक केली. तर त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात यश मिळवले. अटक आरोपींकडून १७ पिस्टल, ३१ मॅग्झीन व १२ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : अटक आरोपींमध्ये रमेश मिसरिया किराडे (विलाला) (२५) आणि आरोपी मुन्ना अमाशा अलवे (बारेला) (३४) दोन्ही आरोपी मध्यप्रदेश राज्यातील आहेत. मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाने १ जून रोजी आरोपी रमेश आणि मुन्ना यांच्या अंगझडतीत पोलीस पथकाला आरोपीच्या पाठीवर असलेल्या सॅगमध्ये ३ देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र), ६ मॅग्झीन, ४ जिवंत काडतुसे, ओपो कंपनीचा एक मोबाईल फोन व एक सँगबॅग असा ऐवज सापडला. पोलीस पथकाने दोघा आरोपींच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
गुन्हेगारांना प्राणघातक शस्त्रविक्री : दोन आरोपींकडे सापडलेला शस्त्रसाठा पाहून पोलिसांनी हा कुणासाठी आणला होता? याची चौकशी करीत असताना ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई सारख्या शहरातील गुन्हेगारांना प्राणघातक शस्त्रविक्री हे आरोपी करीत असल्याचे चौकशीत समोर आले. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशातून गावठी कट्टे विक्रीचा धंदा यांचा असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी अजून सखोल चौकशी केल्यानंतर या दोन आरोपींकडून पोलीस पथकाने मोठ्या कौशल्याने देशी बनावटीची १७ पिस्टल, ३१ मॅग्झीन आणि १२ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात यश मिळवले. गुन्हे शाखा मालमत्ता विभागाची ही मोठी कारवाई आहे.
शस्त्र तस्करी : अटक केलेले आरोपी रमेश मिसरिया किराडे आरोपी आरोपी मुन्ना अमाशा अलवे दोघेही सराईत आरोपी आहेत. १ जून, २०२३ रोजी पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलीस पथकाने या आरोपींच्या माहितीवरून महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेवरील पाचोरी टुनकी भागातून स्थानिक पोलीसांच्या मदतीने आणखी १ अवैध देशी बनावटीचे पिस्टल, २५ मॅग्झीन व ८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. या शस्त्राच्या तस्करीत टोळीचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे. चौकशीत तब्बल १४ देशी पिस्टल पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत. या शस्त्र तस्करीच्या धंद्यात आणि गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलीस वर्तुळातून व्यक्त होत आहे.
हेही वाचा :