ETV Bharat / state

Thane Crime : शादी डॉट कॉमवर ओळख; तरुणीवर अत्याचार करत ४७ लाखांला फसववले, युट्युबरला बेड्या - शादी डॉट कॉम

एका युट्युबरने शादी डॉट कॉमवर ३२ वर्षीय तरुणीचे प्रोफाइल पाहून तीची ओळख वाढवली. नंतर तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तीच्यावर अत्याचार केला. शिवाय विविध कारणाने ४७ लाख ५० हजार रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोणगाव पोलिसांनी त्या युट्युबरवर अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहे. (THANE CRIME)

the YouTuber arrested
युट्युबरला बेड्या
author img

By

Published : Aug 1, 2023, 8:22 PM IST

Updated : Aug 1, 2023, 9:38 PM IST

ठाणे : पुणे येथिल रहिवासी नवनाथ सुरेश चिखले असे अटक केलेल्या युट्युबरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी कुटूंबासह राहते. तर आरोपी नवनाथ हा पुण्यात राहणारा असून तो मनोरंजन म्हणून युट्युबवर गाण्याचे अल्बम करतो. त्यामुळे तो प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी २०२१ ला पीडित तरुणीने शादी डॉट कॉमवर नाव नोंदणी करून आपले प्रोफाइल अपलोड केले. हेच प्रोफाइल पाहून आरोपीने डॉट कॉमवर लग्नास उत्सुक असल्याचा मॅसेज पाठवून पिडीतेचा मोबाईल नंबर मिळवला.

त्यानंतर ओळख वाढवून पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सुरवातीला पीडितेकडून अडीच लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर स्वतःच्या बँक अकाऊंडवर घेतले. त्यातच जून २०२१ मध्ये आरोपी पीडितेच्या घरी आला असता, त्याने तीला घरात एकटी पाहून शारीरिक सुखाची मागणी केली. पीडितेने त्याला नकार देताच आपण लग्न करणार आहोत. असे सांगत बळजबरीने अत्याचार केला.

त्यानंतर पीडितेने लग्नाचा तगादा लावला असता, आरोपी घर नाही नोकरी नाही. कसे लग्न करायचे असे बहाणे सांगु लागला. त्यानंतर पीडितने घरातील दागिने आणि बँकेचे कर्ज काढून आरोपीला आजपर्यत ४७ लाख ५० हजार रुपये दिले. यानंतर आता तर लग्न करू शकतो असे पीडितेने तगादा लावताच त्याने उडवाउडवीचे उत्तर देऊन लग्नास नकार दिला. लग्नाचे अमिष दाखवून आपली लाखो रूपयाची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग सांगताच पोलिसांनी आरोपी नवनाथवर २८ जुलै रोजी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

साहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कडलग, पोलीस हवालदार सुनील पाटील यांनी त्याचा शोध सुरू केला असता २९ जुलै रोजी कल्याण - भिवंडी मार्गावर सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपी पोलीस कोठडीत असताना त्याने अश्याच प्रकारे बऱ्याच तरुणीवर अत्याचार करून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी दिली आहे. त्यामुळे तरुणींनी अश्या तरुणांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

Last Updated : Aug 1, 2023, 9:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.