ETV Bharat / state

Husband Torture Wife : विदेशात पती करायचा पत्नीचा छळ; भिवंडीत गुन्हा दाखल

Husband Torture Wife : ३१ वर्षीय पीडित पत्नीचा 'केनिया' मधील नायरोबी शहरातील हायफ्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या ३८ वर्षीय पतीने मानसिक व शारीरिक छळ केला. या प्रकरणी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात पीडित पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची घटना समोर आली आहे.

Husband Torture Wife
पती विरोधात भिवंडीत गुन्हा दाखल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 7:33 PM IST

ठाणे : Husband Torture Wife : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडित महिला सोना (नाव बदलले आहे) ही भिवंडी शहरातील कामतघर भागातील एका हायफ्रोफाईल सोसायटीत कुटुंबासह राहते. तिचा विवाह गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यात नवाग्राम कच्छराज गावात राहणाऱ्या एका व्यक्तीशी झाला होता. त्यातच विवाहानंतर पती व पीडित पत्नी असे दोघेही 'केनिया' मधील नायरोबी शहरातील हायफ्रोफाईल सोसायटीत संसार करीत होते. यादरम्यान २०१५ ते २०२२ अश्या ७ वर्षांच्या कालावधीत घरगुती कारणावरून दोघात वाद होत होते. याच वादातून पती हा पीडित पत्नीला मानसिक व शारीरिक त्रास देऊन सतत माहेरवरून पैसे आणण्यासाठी तगादा लावत होता. पीडित पत्नी केनिया देशात असल्याने पतीचा छळ सहन करीत होती.

पतीविरुद्ध गुन्हा दाखल : त्यातच काही निमित्ताने पीडित पत्नी भिवंडीत माहेरी आल्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी तिने नारपोली पोलीस ठाणे गाठून केनिया देशात घडलेल्या तिच्यावरील छळाचा प्रसंग महिला पोलीस अधिकाऱ्याकडे कथन केला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून २० ऑक्टोबर रोजी छळ करणाऱ्या पतीविरोधात पोलीस ठाण्यात भादंवी कलम ४९८(अ), ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाड यांच्याशी संपर्क साधला असता पीडित पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली पाटील करीत आहेत.

किडनीसाठी पत्नीचा छळ : पतीने पत्नीचा छळ केल्याची अशीच एक घटना अमरावीत जिल्ह्यात उघडकीस आली होती. वरूड पोलीस ठाण्यात 6 ऑगस्ट, 2021 रोजी एक अजब तितकीच चिंतनिय तक्रार नोंदविण्यात आली होती. ही तक्रार आहे चक्क किडनीबाबतची. पतीने किडनीची मागणी केली. त्यास नकार दिल्याने पतीने आपला शारीरिक व मानसिक छळ चालविला असल्याची तक्रार पत्नीने वरुड पोलीस ठाण्यात दिली होती.

काय आहे संपूर्ण प्रकार : पीडित विवाहितेने 5 ऑगस्ट रोजी रात्री ११च्या सुमारास वरूड पोलीस ठाणे गाठून पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्याच्याविरूद्ध फसवणूक, जीवे मारण्याची धमकी, मारहाण, कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, आरोपी व पीडिताचे मे 2019 मध्ये लग्न झाले होते. आरोपी पतीला लग्नाआधीच किडनीचा आजार होता. त्याचे डायलिसीसही सुरू होते. मात्र, पत्नीपासून त्याने ते दडवून ठेवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने पतीला जाब विचारला. त्यावर तू मला किडनी द्यावी, म्हणूनच तुझ्याशी लग्न केले, असे उत्तर त्याने दिले. त्यामुळे आरोपी पतीने आपल्याला शिवीगाळ करून मारहाण देखील केली, असे त्या विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. 21 मे 2019 ते 5 फेब्रुवारी 2020 दरम्यान या घटना घडल्या.

हेही वाचा:

  1. Thane Crime News: पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल
  2. Physical Abuse of Minors : अल्पवयीन दोन मुलांवर शौचालयात लैंगिक अत्याचार; नराधमाला बेड्या
  3. Dead Body In Suitcase : धक्कादायक! बेवारस सुटकेसमध्ये आढळले अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचे तुकडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.