ETV Bharat / state

Husband Attacks Wife : पतीने भररस्त्यात पत्नीवर केला चाकूने वार अन् पिस्तूलमधून झाडली स्वतःवर गोळी - चारित्र्य संशयातून पतीकडून पत्नीवर हल्ला

चारित्र्य संशयातून पती-पत्नीमध्ये वाद झाला ( Husband Attacks Wife in Dombivli ) होता. या वादातून पतीने पत्नीवर भररस्त्यात चाकूने वार केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. पत्नीवर चाकूने सपासप वार केल्यानंतर त्याने पिस्तूलमधून स्वतःवर गोळी झाडली. सोमनाथ देवकर (४५) असे पतीचे नाव आहे.

Crime in Dombivli
डोबिंवली
author img

By

Published : Feb 13, 2022, 5:02 PM IST

Updated : Feb 13, 2022, 5:09 PM IST

ठाणे - चारीत्र्याच्या संशयातून भररस्त्यात पत्नीवर ( Husband Attacks Wife in Dombivli ) धारधार चाकूने वार करून तिला गंभीर जखमी करून फरार झालेल्या पतीने पिस्टलमधून स्वतःवरच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना डोंबिवली ( Crime in Dombivli ) पूर्व भागातील दत्त नगर परिसरात घडली आहे. 5 दिवसापासून फरार असलेल्या आरोपी पतीला रामनगर पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत त्याला ताब्यात घेऊन खाजगी रुग्णालयात उपचासाठी दाखल केले आहे. सोमनाथ देवकर (४५) असे पत्नीवर चाकूने वार करून स्वतःवर गोळी झाडणाऱ्या हल्लेखोर पतीचे नाव आहे.

चारीत्र्याच्या संशयातून भररस्त्यात पत्नीवर धारधार चाकूने वार
पत्नीवर धारदार चाकूने वार झाला फरार -

डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर भागातील गावदेवी मंदिराजवळ आरोपी सोमनाथ व पत्नी वंदना राहतात. काही दिवसापासून आरोपी सोमनाथ हा बेरोजगार असल्याने वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन घरातील पैसेही चोरते असा आरोप करत होता. मात्र पत्नी वंदनाने आरोपी पतीला अनेक वेळेला समजवण्याचा प्रयत्न केला. पण सोमनाथ ऐकत नसल्याने वैतागलेल्या पत्नीने पतीविरोधात ८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारच्या सुमारास स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पत्नी वंदना पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घरासमोर रिक्षात बसल्या. अचानक पाठीमागून आलेल्या आरोपी सोमनाथने वंदना यांच्या मानेच्या खाली, पायावर आणि हातावर धारदार चाकूने वार करून घटनास्थळावरुन फरार झाला होता. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या वंदनाला रिक्षाचालकाने रुग्णालयात उपचारासाठी नेत होता. त्यावेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांनी रिक्षात महिला पाहिल्यावर रिक्षा थांबवून रिक्षाचालकाकडे विचारणा केली असता घडलेला सर्व प्रकार समोर आला. पोलिसांनी जखमी तत्काळ जखमी महिलेला डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करून रामनगर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी हल्लेखोर पतीचा शोध सुरु केला.

बेकायदा पिस्टल मधून झाडली स्वतःवर गोळी -

गेल्या पाच दिवसापासून आरोपी पती चा पोलीस शोध घेत असतानाच, आज सकाळी १० वाजल्याच्या सुमारास दत्तनगर येथील राहत्या घरात फरार आरोपीने स्वतःवर पिस्टलमधून गोळीबार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पिस्टल जप्त केले. तर गंभीर अवस्थेत आरोपी पतीला डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृतीचिंताचक असल्याचे सांगण्यात आले. तर त्याने ज्या पिस्टलमधून गोळी झाडली ती बेकायदा असून त्याने कोणाकडून कधी आणली याचाही तपास पोलिसांनी सुरु केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली आहे.

हेही वाचा - Anna's movement : सरकारच्या पत्रानंतर अण्णा हजारेंनी उपोषण केले स्थगित

Last Updated : Feb 13, 2022, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.