ETV Bharat / state

५० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; पोलिसांच्या सावधगिरीने चौकडी गजाआड - हिल लाईन पोलीस न्यूज

सनी अनवाणी या जीन्स विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे ५० लाखांच्या खंडणीसाठी रिक्षातून अपहरण झाले होते. सनीच्या मोबाईलवरून अपहरणकर्त्यांनी ५० लाखासाठी सनीच्या घरच्यांना धमकावण्यास सुरुवात केली. पैसे नाही दिले तर, सनीला जिवे मारण्याची धमकीही दिली. यातील एका आरोपीचे सनीसोबत व्यापारी संबंध असल्याचे समोर आले आहे. सनीचे अपहरण करून धमकावल्यास लगेच पैसे मिळतील, असे अपहरणकर्त्यांना वाटले होते.

उल्हासनगर जीन्स व्यापारी अपहरण
उल्हासनगर जीन्स व्यापारी अपहरण
author img

By

Published : Aug 30, 2020, 4:19 PM IST

ठाणे - उल्हासनगर शहरातील एका जीन्स व्यापाऱ्याचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मोबाईल लोकेशन व सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अपहरणकर्त्या चौकडीला हिललाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सनी अनवाणी असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

५० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण

सनी अनवाणी या जीन्स विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे ५० लाखांच्या खंडणीसाठी रिक्षातून अपहरण झाले होते. मागील आठवड्यात सनी नेहमीप्रमाणे उल्हानसागरमधील घरातून निघाले. भाटीया चौकातून रिक्षाने प्रवास करून दुकानात जात होते. ठरल्या वेळेत घरातून निघून दुकानात जाण्यास एका रिक्षात बसले. मात्र, रिक्षाचालकाने रिक्षा दुकानाच्या दिशेने न वळवता थेट अनोळखी दिशेने वळवली. त्यामुळे सनीला संशय आला आणि त्याने धावत्या रिक्षातून मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. मात्र, पाऊस जोरात पडत असल्याने सनी यांचा आवाज नागरिकांपर्यंत ऐकू गेला नाही. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी सनी यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बेदम मारहाण करीत कल्याण तालुक्यातील रायता नदीच्या दिशेने नेले. या ठिकाणी पोहचताच सनीच्या मोबाईलवरून अपहरणकर्त्यांनी ५० लाखासाठी सनीच्या घरच्यांना धमकावण्यास सुरुवात केली. पैसे नाही दिले तर, सनीला जिवे मारण्याची धमकी घरच्यांना दिली. यामुळे सनीच्या वडिलांनी घाबरून तत्काळ हिललाईन पोलीस ठाणे गाठून हा प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांना सांगितला.

पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तत्काळ सनीच्या मोबाईलचे लोकेशन काढून दोन पोलीस पथके रवाना केली. मात्र काही तास आरोपींनी सनीचा मोबाईल बंद केला आणि त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता. आरोपींचे सतत स्थलांतर आणि लोकेशन मिळत नसल्याने सनीचा जीव वाचवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

अपहरणकर्त्यांचे मोबाईल लोकेशन मिळाल्यावर पोलीस आणि अपहरणकर्ते असा पाठलाग सुरू झाला. त्यामुळे अपहरणकर्त्यांना पोलीस पाठलाग करत असल्याचे समजताच त्यांनी सनीची सुटका केली. त्यानंतर सनीला ताब्यात घेत हिललाईन पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. चार ते पाच दिवसांत हिललाईन पोलिसांनी चौघांना बदलापूरहून ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता, त्यांनी अपहरण केल्याचे कबूल केले. व्यापारी सनी आणि यातील एक आरोपी याचे सनीसोबत व्यापारी संबंध असल्याचे समोर आले आहे. सनीचे अपहरण करून धमकावल्यास लगेच पैसे मिळतील, असे अपहरणकर्त्यांना वाटले होते. परंतु, असे न होता चौघेही पोलिसांच्या पिंजऱ्यात अडकले. ह्या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास हिल लाईन पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.