ETV Bharat / state

Kalwa Bridge Thane: कळवा पुलाची झाली जीर्ण अवस्था; या हेरीटेज पुलाचे करायचे काय? ठाणे मनपा प्रशासनासमोर प्रश्न

author img

By

Published : Jun 25, 2023, 9:36 AM IST

ठाणे शहरातील हेरीटेज बांधकामापैकी एक असलेला कळवा खाडीवरील ब्रिटीशकालीन दगडी पूल तब्बल १६० वर्षे जुना आहे. हा पूल कमकुवत बनल्याने २०११ सालापासुन अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. तरीही, या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरूच होती. मात्र, महाडच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर हा पूल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. या पुलाशेजारीच दोन नविन पुल उभारल्याने वाहतुकीची समस्या मिटली. मात्र, जुना पूल जीर्ण अवस्थेत उभा आहे. या हेरीटेज पुलाचे आता करायचे काय? असा प्रश्न ठाणे मनपा प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

Kalwa Bridge Thane
कळवा पुल बनला समस्या
कळवा पुल बनली समस्या

ठाणे : पूर्वीच्या काळी ठाणे शहरातून कळवा येथे जाण्यासाठी खाडीतून फेरी बोटीची व्यवस्था होती. खाडीनजीक असलेल्या ठाणे किल्यावरुन (आजचे ठाणे मध्यवर्ती कारागृह) कळव्यावर नजर ठेवता येत असे. मात्र, ब्रिटीश अंमलात कळवा आणि ठाणे शहराला जोडण्यासाठी सन १८६३ रोजी या दगडी पुलाचे बांधकाम करण्यात आले. उत्तम स्थापत्यकलेचा नमुना असलेल्या या पुलावर आजही दगडातील बांधकामाचे अवशेष दिसुन येतात .पुलावर ठराविक अंतरावर सज्जा असून तेथून खाडीचे विहंगम दृश्य न्याहाळता येते. कालांतराने लोकवस्ती आणि वाहनांची संख्या वाढल्याने कळवा खाडीवरील या एकमेव पुलाची क्षमता संपली. तसे पत्रदेखील ब्रिटीश प्रशासनाने महाराष्ट्र सरकारला पाठवले होते. तेव्हा, ठाणे महापालिकेने १९९५ मध्ये या पुलाला समांतर दुसरा पूल उभारला.

पुलावरील वाहतूक बंद : २०१० मध्ये जुन्या कळवा पुलाचे संरचनात्मक परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडीट) करण्यात आले. यामध्ये अवजड वाहनांसाठी हा पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्याने या पुलावरुन फक्त दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती. त्यानंतर, २०१६ साली महाड येथील सावित्री पुल दुर्घटनेनंतर या पुलावरील वाहतूक बंद करून पुलावरुन फक्त पादचारी ये-जा करीत होते. काही कालावधीनंतर पुलाच्या दोन्ही दिशेला अडथळे उभारून पादचाऱ्यांसाठीही हा पुल बंद करण्यात आला.

कळवा पुलाचे जतन : दरम्यान, वादळ, वारे, पावसात कसाबसा तग धरून उभा असलेला हा पुल हेरीटेज असल्याने पाडण्यात अडचणी उदभवत असल्याची कबुली पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे या कळवा पुलाचे करायचे तरी काय? असा सवाल पालिकेला पडला आहे. ब्रिटीशकालीन कळवा पुलाचे जतन करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. या पुलाचे अवशेष बाहेर दिसु लागल्याने काही चोर व गर्दुल्यांनी पुलाचे पोलाद तसेच साखळदंड चोरी केल्याचे प्रकार उघडकीस आले होते.

कळवा पुलाचे धार्मिक महत्त्व : ब्रिटीशकालीन कळवा पुलाला धार्मिक महत्वदेखील आहे. पूर्वी दरवर्षी नारळी पौर्णिमेला याच कळवा जुन्या पुलावरून थेट खाडीत नारळ अर्पण करण्याची प्रथा परंपरा जपली जात असे. नारळी पौर्णिमेसाठी भाविकांची रीघ लागण्यासह जत्रा भरत असे. मात्र, गेली काही वर्षे या पुलावरील वावरावर प्रशासनाकडुन निर्बंध लावले आहेत. हेरिटेज असल्याने पुल पडता ही येत नाही आणि तो पुल पडतही नाही, त्यामुळे कळवा पुल प्रशासनाच्या गळ्यातील लोढणे झाला आहे का ? असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे.

हेही वाचा :

  1. Inauguration Stalled: मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत कळवा पुल व वाय जंक्शन पुलाचे उद्घाटन रखडले
  2. India's First Cable-stayed Bridge: देशातील पहिल्या केबल आधारित रेल्वे पुलाचे काम पूर्ण
  3. Kopri Bridge in Thane : 'या' कालावधीत ठाण्यातील कोपरी पुलावर वाहतूक राहणार बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.