ETV Bharat / state

मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय महाराष्ट्रात आधुनिकतेचे प्रतीक ठरेल - हेमंत नगराळे - हेमंत नगराळे यांच्याबद्दल बातमी

मीरा भाईंदर वसाई विरार पोलिस आयुक्तालय हे आधुनिकतेचे प्रतीक ठरेल असे महासंचालक हेमंत नगराळे म्हणाले. ते पोलीस नियंत्रण कक्ष, वेबसाईट, परिषद कक्ष उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

Hemant Nagarale said Mira Bhayander Police Commissionerate would be symbol of modernity in Maharashtra
मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय महाराष्ट्रात आधुनिकतेचे प्रतीक ठरेल - हेमंत नगराळे
author img

By

Published : Feb 9, 2021, 4:43 PM IST

Updated : Feb 9, 2021, 4:56 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालय हे महाराष्ट्रात आधुनिकतेचे प्रतीक ठरेल. या आयुक्तालयाचा आदर्श इतरही आयुक्तालये डोळ्या समोर ठेवतील, असे गौरव उदगार पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी काढले. ते पोलीस नियंत्रण कक्ष, वेबसाईट, परिषद कक्ष उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय महाराष्ट्रात आधुनिकतेचे प्रतीक ठरेल - हेमंत नगराळे

नियंत्रण कक्ष,वेबसाईट उद्घाटन -

मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयात आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेल्या पोलिस नियंत्रण कक्ष, वेबसाईट व परिषद कक्ष चे उदघाटन प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले, अत्यंत कमी दिवसात आयुक्तलयाने महापालिकेच्या वास्तूत अद्यावत कार्यालय सुरू केले. स्वतंत्र इमारत, कमी कर्मचारी असतानाही चांगली कामगिरी बजावत नियंत्रण कक्ष, वेबसाईट सुरू केली. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी देण्यात आले आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वाढीसाठी एका समितीचे गठन करण्यात आले असून त्यात उपायुक्त (गुन्हे), ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक यांचा समावेश आहे. समिती जिल्ह्यातील तसेच बाहेरील कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना या आयुक्तालयात समाविष्ट करून घेतील.

लवकरच पोलीस भरती -

या आयुक्तालयात ४४% जागा रिकाम्या आहेत. पोलिस भरती प्रक्रिया सध्या न्याय प्रविष्ट आहे. नंतर त्यातून सुद्धा कर्मचारी उपलब्ध होतील. त्यामुळे नव्याने निर्मिती होणारी पोलिस ठाणी कार्यान्वित होण्यास सुलभ होईल. पोलिस वसाहतीसाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करत आहे. आवश्यक ते मनुष्यबळ, वाहने, अनुदान मिळवून देण्यासाठी योग्य ती पावले पोलिस महासंचालक कार्यालयानी उचलली असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला अपर पोलिस महासंचालक, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते, अतिरिक्त आयुक्त, एस जयकुमार उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

Last Updated : Feb 9, 2021, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.