ठाणे Gutkha Smuggling Case Thane: बनावट 'टॅक्स इन्व्हाईस' बनवून त्यावर कपड्याचे माल पाठवत असल्याचे भासवून गुजरातच्या दोन कापड कंपनीच्या मालकांनी प्रतिबंधित गुटख्याचा माल महाराष्ट्रात विक्री करण्याच्या हेतूने भिवंडीतील कंपनीत पाठविला. अशाप्रकारे कंपनीची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन कंपनीच्या मालकांवर नारपोली पोलीस ठाण्यात फौजदारी दाखल करण्यात आला आहे. स्टाईल इंडिया टेक्सटाईल्स प्रा. लि कंपनीचे मालक आणि आशा फेब्रिक्सचे मालक (दोन्ही रा.सुरत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
कपडा गोडाऊनमध्ये ठेवला गुटख्याचा साठा: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर रोजीच्या दरम्यान आरोपी दोन्ही कंपनीच्या मालकांनी आपसात संगनमत करून ९ लाख ९६ हजार ५७० रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्याचा साठा भिवंडीतील दिवे येथील इंडियन कंपाउंड येथील डिलीव्हरी लिमिटेडच्या वेगवेगळ्या वेअरहाऊसमध्ये बनावट 'टॅक्स इन्व्हाईस' बनवून त्यावर कपड्याच्या मालाच्या नावाच्या नोंदी केली. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध भागात कपडे विक्रीच्या उद्देशाने पाठवून डिलीव्हरी कंपनीची फसवणूक केली आहे.
गुटख्याचा माल जप्त: दरम्यान कपड्याच्या आडून गुटखा तस्करी होत असल्याची खबर नारपोली पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी या प्रतिबंधित गुटख्याचा माल जप्त केला. २ नोव्हेंबर रोजी पोलीस हवालदार सुनिल वसंत जाधव यांच्या फिर्यादीवरून दोन मालकांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच कपडा व्यापारी फरार: या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांच्याशी संपर्क साधला असता, गुजरातचे दोन कपडा व्यापारी कपड्याच्या आडून गुजरातहून गुटखा भिवंडीत वाहतूक करून आणला होता. या दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांची कुणकुण लागताच दोघेही आरोपी मालक फरार झाले. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुढील तपास सपोनि एस.टी. कर्णवर पाटील करीत आहेत.
हेही वाचा: