ETV Bharat / state

Guru Nanak Jayanti Rally: गुरूनानक जयंतीच्या निमित्ताने ठाण्यात जल्लोषात मिरवणूक - कल्याण डोंबिवली शहरातील शिख बांधवांनी

शिख समाजाचे पहिले गुरू गुरूनानक देव यांची येत्या मंगळवारी जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज सायंकाळी कल्याण डोंबिवली शहरातील शिख बांधवांनी मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली. (Guru Nanak Jayanti Rally). (Guru Nanak Jayanti in thane).

Breaking News
author img

By

Published : Nov 6, 2022, 9:11 PM IST

ठाणे: शिख समाजाचे पहिले गुरू गुरूनानक देव यांची येत्या मंगळवारी जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज सायंकाळी कल्याण डोंबिवली शहरातील शिख बांधवांनी मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली. (Guru Nanak Jayanti Rally). विशेष म्हणजे कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली होती. यंदा मात्र सरकारने कोरोनाचे नियम शिथिल केल्याने मिरवणूकीत शीख बांधवांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. (Guru Nanak Jayanti in thane).

गुरूनानक जयंतीच्या निमित्ताने ठाण्यात जल्लोषात मिरवणूक

मिरवणूक शहरवासियांचे आकर्षणाचे केंद्र: कल्याण पश्चिम भागातील रामबाग परिसरात गुरुद्वारा आहे. या गुरुद्वारा पासून शहरातील विविध प्रमुख मार्गावर काढण्यात आलेली पालखी मिरवणूक शहरवासियांचे आकर्षणाचे केंद्र बनली होती. गुरुद्वारा येथून गुरूनानक देव जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीस धार्मिक परंपरेनुसार सुरुवात झाली. दिव्यांची, फुलांनी सजविलेल्या रथात गुरूनानक देव यांच्या ग्रंथाची पालखी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. त्यापाठोपाठ कीर्तन करणाऱ्या महिलांचे पथक मिरवणुकीत होते. भक्ती, गुरू कीर्तन व पंचप्यारे यांच्या उपस्थितीत भक्तीभावाने गुरूनानक देव जयंतीची मिरवणूक काढण्यात आली. मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी गुरुद्वारामध्ये गुरूनानक देव जयंतीनिमित्ताने आजपासून अखंड पाठ आरंभ करण्यात आला होता. रोषणाईमुळे गुरुद्वारा परिसर उजळला होता. शिख बांधवांनी कीर्तन, अरदास (प्रार्थना), लंगर यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.