ETV Bharat / state

ग्रामसभेत महिला सरपंचासह सदस्यांशी वाद घालणाऱ्याविरोधात 'निषेध सभा'

काही काळ ग्रामसभेत तणाव निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्या तरुणांविरोधात विनयभंग व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. तर दुसरीकडे याघटनेमुळे सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हनुमान मंदिर समोर शेकडोच्या संख्येने एकत्र येत या घटनेचा निषेध करण्यासाठी सभा आयोजित केली.

सरपंच बोलताना
सरपंच बोलताना
author img

By

Published : Mar 30, 2022, 8:21 PM IST

Updated : Mar 30, 2022, 8:34 PM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत महिला सरपंचासह सदस्यांशी वाद घालणाऱ्या विरोधात सर्व पक्षीय एकत्र येत गावकऱ्यांनी निषेध सभेचे आयोजन केले. यावेळी सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे यांनी शुल्लक कारणावरून कायदा व सुवेस्थाचा प्रश्न निर्माण करणाऱ्या विरोधकांचा निषेध सभेत साडे चार वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचत समाचार घेतला.

ग्रामसभेत बोलताना महिला सरपंच
प्रकरण गेले पोलीस ठाण्यात : कोन गाव ग्रामपंचायतची स्थापना १९५२ साली झाली असून ग्रामपंचायतमध्ये आतापर्यत हजारो ग्रामसभा झाल्या. तेव्हापासून सरपंच अथवा सदस्यासह गावकऱ्यासोबत गावातील विविध प्रश्न ग्रामसभेत सोडवत असतात. मात्र तीन दिवसापूर्वी झालेल्या ग्रामसभेत गावातील काही तरुणांनी ग्रामसभेत बसण्याची परवानगी मागितली होती. मात्र नियमानुसार सरपंच डॉ रुपाली कराळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी कायदेशीर सल्ला घेऊन परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगताच भर ग्रामसभेत ३ ते ४ तरुणांनी सरपंच व महिला सदस्यांशी वाद घालत त्यांच्याशी अशोभनीय वर्तन केले. त्यामुळे काही काळ ग्रामसभेत तणाव निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्या तरुणांविरोधात विनयभंग व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. तर दुसरीकडे याघटनेमुळे सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हनुमान मंदिर समोर शेकडोच्या संख्येने एकत्र येत या घटनेचा निषेध करण्यासाठी सभा आयोजित केली. या निषेध सभेत महिला सदस्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गावात कायदा व सुवेस्थाचा प्रश्न निर्माण करणाऱ्याच्या विरोधात मनोगत व्यक्त केले. सभेवेळी पोलीस कर्मचारी तैनात होते.

हेही वाचा - First Bitcoin Fraud Scam : देशातील पहिला बिटकॉइन फसवणूक घोटाळा; तपास एसआयटीकडे देण्याची तक्रारदारांची मागणी

Last Updated : Mar 30, 2022, 8:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.