ठाणे - 15 जानेवारीला होणाऱ्या सहा तालुक्यातील ८२२ ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीत 1 हजार 515 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी केवळ भिवंडी तालुक्यात निवडणूकींवरुन एकाच आठवड्यात तीन दिवसात चार गंभीर गुन्हे घडले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये भीतीचे वातारण पसरले आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्तापित राजकारणी दहशतीच्या बळावर निवडणुक जिंकण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍड. भारद्वाज चौधरी यांनी केला आहे. मतदारांनी कोणाच्याही दहशतीला न जुमानता निर्भीडपणे मतदान करण्याचे आवाहनही केले आहे. विशेष म्हणजे सध्या अमेरिकेतही राजकीय दहशतीचा डोम पाहायला मिळत आहे आणि तेच येथील ग्रामपंचायत निवडणुकीत घडल्याचे सांगून मतदार नक्कीच अशांना धडा शिकवतील असे मत चौधरी यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मांडले.
ग्रामपंचायत धुमशान, अमेरिकेत घडले, तेच ग्रामपंचायत निवडणुकीत घडते युतीच्या काळातील सरपंच निवडीचा निर्णय योग्ययुती सरकारच्या काळात ग्रापंचायत हद्दीत राहणाऱ्या मतदारांमधून थेट सरपंच निवडीचा निर्णय योग्य असल्याचे मत आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍड. भारद्वाज चौधरी यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीचे सरकार येताच त्यांनी युतीच्या काळातील निर्णय बदल करून पुन्हा वंश परंपरा असलेल्या प्रस्थापितांच्या ताब्यात गाव कसे टिकणार, यासाठी मतदारांमधून थेट सरपंच निवडीचा अधिकार रद्द केला. ग्रापंचायत निवडणुकीत दहशदवाद पुन्हा आणला, असे मतही त्यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मांडले.
भिवंडीत तीन दिवसात चार गंभीर घटना विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रापंचायतीच्या निवडणुका भिवंडी तालुक्यात आहे. या तालुक्यात एकूण 56 ग्रामपंचयातीच्या निवडणुकासाठी 574 उमेदवारांपैकी 108 उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात काल्हेरच्या शिवसेना शाखा प्रमुखांवर मध्यरात्री दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून गोळीबार झाल्याचा आरोप ग्रामपंचायत निवडणुकीत काल्हेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दिपक म्हात्रे यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली. त्याच दिवशी सायंकाळी गूंदवली गावात निवडणुकीवरून भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांच्या दोन गटामध्ये रक्तरंजित राडा झाला होता. या दोन्ही गंभीर गुन्ह्याची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात दाखल असून यातील दोन्ही गटातील आरोपींना अटक केली तर तिसरी घटना खारबाव ग्रामपंचायत हद्दीत घडली. येथील एका महिला उमेदवाराची चारचाकी वाहन जाळून भीती निर्माण केल्याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या गुन्ह्यातील आरोपीला अद्यापही पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. तर गुरवारी निवडणूक कार्यलयात दोन्ही उमेदवारानी जोरदार राडा केल्याने तालुक्यातील मतदारांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाला. या गुन्ह्यातील आतापर्यंत सहा आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका शांततेने पार पाडण्यासाठी आता सर्वच राजकीय यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून आले.
हेही वाचा - 'भंडाऱ्यातील घटना प्रगतीशील महाराष्ट्राला काळिमा फासणारी'