ETV Bharat / state

भिवंडी पालिका औषध, आर्थिक अपहार प्रकरण; शासनाचे कारवाईचे आदेश

भिवंडी पालिकेचे तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या शेट्टी यांच्यावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करून शासनाला अहवाल सादर करावा, असे गोपनीय पत्र नुकतेच राज्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई विभागाचे सहसंचालक महेश बोटले यांनी महापालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांना पाठविले आहे. मात्र, राजकीय दबावामुळे महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

भिवंडी महापालिका
भिवंडी महापालिका
author img

By

Published : Oct 13, 2020, 8:54 PM IST

ठाणे - भिवंडी शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय विभागातील प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अपहार प्रकरणी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी तत्कालीन महापौर जावेद दळवी यांनी शासनाकडे केली होती. त्यामुळे शासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन भिवंडी पालिकेच्या मुख्य लेखा परिक्षकांमार्फत गोपनीय चौकशी करून त्यांनी दिलेल्या अहवालानुसार तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या शेट्टी यांच्यावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करून शासनाला अहवाल सादर करावा, असे गोपनीय पत्र नुकतेच राज्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई विभागाचे सहसंचालक महेश बोटले यांनी महापालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांना पाठविले आहे. मात्र, राजकीय दबावामुळे महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

त्यामुळे माजी महापौरांसह नगरसेवक तीव्र नाराज झाले असून राज्याचे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भिवंडी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय विभागाअंतर्गत शहरात विविध ठिकाणी 15 आरोग्य उपकेंद्र सुरू आहेत. या आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांसाठी सरकारने दरवर्षी औषधांचा पुरवठा केला आहे. त्यापैकी 2015 -16 पासून सन 2018-19 पर्यंत या विभागातील प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अपहार तसेच शासनाकडून आलेल्या औषधांच्या नोंदीचे स्टॉक रजिस्टर व अनेक महत्वाचे दस्तऐवज गहाळ करून आर्थिक अपहार केल्याची तक्रार शिवसेना व भाजप नरसेवकांनी तत्कालीन महापौर जावेद दळवी यांच्याकडे केली होती.

त्यामुळे तत्कालीन महापौर जावेद दळवी यांनी दखल घेत शासनाकडे तक्रार केली आहे. त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांच्यासह कर्मचारी व आरोग्य विभागातील डॉक्टर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत शासनाने पालिकेचे तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांना या प्रकरणी गोपनीय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त हिरे यांनी पालिकेचे मुख्य लेखा परिक्षक कालिदास जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. लेखापरिक्षक जाधव यांनी या प्रकरणी सखोल गोपनीय चौकशी करून सुनावणी घेतली असता शासनाकडून आलेल्या औषधांच्या नोंदीचे स्टॉक रजिस्टर व अनेक महत्वाचे दस्तऐवज डॉ.शेट्टी यांनी सादर केलेले नाही तर काही औषधे व दस्तऐवज आगीमध्ये जळून खाक झाल्याचा बहाणा करण्यात आला आहे. मात्र, याबाबत डॉ. शेट्टी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केलेली नाही. तसेच शासनाकडील शासकीय रुग्णालय, डी.डी.कार्यालय, डी.एच.ए.कार्यालय, क्षयरोग कार्यालय, पुणे आदींकडून आलेल्या लाखो रूपयांचा औषधसाठा तसेच जन्म , मृत्यू दाखल्यांबाबत प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अपहार प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. शेट्टी यांच्यासह अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुनावणी घेतली असता ते समाधानकारक उत्तर अथवा लेखी जबाब देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे पालिकेचे मुख्य लेखा परिक्षक कालिदास जाधव यांनी गोपनीय चौकशी तपास अहवाल तयार करून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठवून दिला आहे.

या चौकशी अहवालाची पडताळणी करून राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई विभागाचे सहसंचालक महेश बोटले यांनी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांना लेखी पत्र पाठवून अपहार प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. शेट्टी यांच्यावर कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. मात्र, आयुक्त डॉ. आशिया यांच्यावर राजकीय दबाव आल्याने गेल्या दीड महिन्यापासून शासकीय आदेश गुंडाळून ठेवले आहेत. तसेच पालिका आयुक्त प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची सखोलपणे चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना, भाजप नगरसेवक व तक्रारदार माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक जावेद दळवी यांनी केली आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्री-राज्यपाल वादात हिंदुत्ववादी नेत्याची उडी; म्हणाले, भाजपालाच हिंदुत्व समजण्याची गरज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.