ETV Bharat / state

ठाण्यात जुगार अड्ड्यावर गुंडांचा हैदोस; तरुणावर चाॅपरने हल्ला - ठाणे जुगार अड्डा न्यूज

दिवसेंदिवस ठाणे जिल्हा हा गुन्हेगारीचे केंद्र होत असल्याचे दिसते. ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी ठाण्यात एका तरुणाच्या खूनाचा प्रयत्न झाला.

Criminal
आरोपी
author img

By

Published : Jan 26, 2021, 8:30 AM IST

Updated : Jan 26, 2021, 9:23 AM IST

ठाणे - काही महिन्यांपूर्वी ऐरोली येथील गरम मसाला हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी ठाण्यात एका तरुणाच्या खूनाचा प्रयत्न झाला. ठाणे पोलिसांनी या गुन्हानंतर आरोपींना पकडून कारवाई करण्याऐवजी चक्क गुन्ह्याचे स्थळ बदलण्याचे काम केले. ठाण्यात सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध क्लब सुरू आहेत याठिकाणी करोडो रुपयांचा जुगार खेळला जातो.

अशी झाली घटना -

आपल्या विरोधात साक्ष दिली म्हणून दोन आरोपींनी विरुद्ध टोळीतील एका सदस्यावर पत्त्यांच्या क्लबमध्ये घुसून जीवघेणा हल्ला केला. आरोपी मंदार गावडे आणि अभिषेक जाधव हे दोघे ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका पत्त्यांच्या कल्बमध्ये बसलेल्या प्रथमेश निगुडकर या तरुणाला शोधत आले. तो समोर दिसताच हातातील धारदार चाॅपरने प्रथमेशवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. दोन्ही आरोपींनी प्रथमेशला मारण्यास सुरुवात करताच, क्लबमधील सर्व माणसे बाहेर पळाली. मंदार आणि अभिषेक या दोन्ही आरोपींनी प्रथमेशच्या डोक्यात, हातावर, मानेवर, छातीत आणि पोटावर वार केले. नंतर दोन्ही आरोपींनी प्रथमेशला क्लबच्या बाहेर नेले आणि तिथेही त्याला मारहाण केली. त्यानंतर दोघेही प्रथमेशला त्याच अवस्थेत सोडून पळून गेले. प्रथमेशवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी अभिषेक नावाच्या आरोपी पकडले आहे.

बदला घेण्यासाठी केला हल्ला -

14 जुलै 2019 मध्ये नवी मुंबईतील ऐरोली आणि ठाणे शहराच्या हद्दीवर असलेल्या गरम मसाला या हाॅटेलमध्ये प्रथमेश निगुडकर हा आपल्या साथीदारांसोबत असताना तेथे मंदार गावडे आणि त्याच्या साथीदारांनी प्रथमेश निगुडकर आणि त्याच्या साथीदारांवर गोळीबार केला होता. यात कोणाला दुखापत झाली नाही. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे आणि प्रथमेश त्यात साक्षीदार आहे. या खटल्यात प्रथमेशची साक्ष महत्वाची आहे. त्यामुळे प्रथमेशला शोधत मंदार आणि अभिषेक पत्ताच्या क्लबमध्ये आले होते. आमच्या विरोधात तू साक्ष कशी देतो हेच पाहतो? असे बोलून मंदार आणि अभिषेकने प्रथमेशवर वार केले.

पोलिसांनी घटनेचे स्थळ बदलले -

ही घटना घडल्यानंतर या संदर्भामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, हा गुन्हा दाखल होत असताना आपण अडचणीत येऊ नये याची खबरदारीही घेतली. गुन्हा घडला हे ठिकाण एक जुगाराचा अड्डा होता. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज याचा पुरावा होता, असे असताना देखील ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करताना घटनेचे स्थळ बदलून आपली प्रतिमा मलिन होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला आहे.

जुगाराचे अड्डे सुरूच -

ठाण्यात कोपरी पोलीस ठाणे, वागळे इस्टेट पोलीस ठाणे, श्रीनगर पोलीस ठाणे, राबोडी पोलीस ठाणे आणि नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचे मोठे-मोठे अड्डे सुरू आहेत. त्यातून पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात मलिदा मिळतो. त्यामुळे यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत .

डान्स बारही तेजीत -

ठाण्यात पोलिसांच्या मंथन हॉल शेजारी असलेल्या डान्स बारमध्ये पहाटेपर्यंत ग्राहकांचा हैदोस सुरू असतो. अशाच प्रकारे राबोडी भागातही राजकीय वरद हस्तामुळे डान्स बार पहाटेपर्यंत सुरू असतात. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नाही.

Last Updated : Jan 26, 2021, 9:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.