ठाणे - ठाण्यात एका मिठाईची ( Sweets ) चर्चा आहे ही मिठाई चक्क सोन्याचा वर्ख लावलेली ( Gold Sweets from Prashant Corner ) आहे. त्यामुळे या मिठाईची किंमती देखील तशीच आहे. दरवर्षी दिवाळी आणखी स्पेशल ( Diwali special ) करण्यासाठी ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाई विक्रेत्यांनी सोन्याचा वर्ख लावलेली ड्राय फूट असलेली अशी स्वादिष्ट अशी मिठाई आणली आणली आहे. या मिठाईची किंमत थोडी जास्त असली तरीही मोठ्या प्रमाणात ठाणेकर या मिठाईला आपली पसंती देत आहेत.
18 हजार रुपये किलो - दिवाळी अगदी दोन दिवसांवर आली आली असून महागडे फटाके वाजवून पैसे वाया घालावीण्यापेक्षा महागडी मिठाई खाऊन आपला दिवाळी सण गोड करण्याकडे नागरिकांचा कल सध्या दिसत ( 18 thousand rupees sweets are preferred by Thanekar ) आहे. ठाण्यातील सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर यांनी यंदा २४ कॅरेट सोन्याचा वरख लावलेली मिठाई बाजारात आणली आहे. ममरा बादाम, काश्मिरी केसर, पिस्ता यासारख्या अतिउत्तम जिन्नस वापरून तयार केलेली ही मिठाई ८,12, 18, 24 नगामध्ये ही मिठाई उपलब्ध असून 18 हजार रुपये किलो अ( 18 thousand rupees sweets are preferred by Thanekar ) शी याची किंमत ठेवण्यात आली असली तरीही ग्राहक त्याला पसंती देत आहेत.