ETV Bharat / state

५०० रुपयांत बनावट कोरोना रिपोर्ट!!! ठाणे पोलिसांनी केला टोळीचा पर्दाफाश, ४ अटकेत

भिवंडी शहरातील कोरोना रुग्णांचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ही टोळी अवघ्या ५०० रुपयात कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट विकत होती. याप्रकरणी पॅथॉलॉजी लॅबच्या मालकासह एकूण चौघांना गुन्हे शाखेने अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

author img

By

Published : Apr 23, 2021, 2:36 PM IST

Updated : Apr 23, 2021, 3:16 PM IST

Bhiwandi
Bhiwandi

ठाणे : भिवंडी शहरातील कोरोना रुग्णांचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ही टोळी अवघ्या ५०० रुपयात कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट विकत होती. याप्रकरणी पॅथेलॉजी लॅबच्या मालकासह एकूण चौघांना गुन्हे शाखेने अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस स्टेशन येथे कलम ४२०,४६५,४६८, ४७१, २६९,२७०, ३४ सह कोवीड – १९ उपाययोजना २०२० नियम ११ प्रमाणे साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम २, ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

नामुलहक उर्फ रब्बनी अनवारूल हक सैयद (वय ३१ , रा. भिवंडी), अफताब आलम मुजीबुल्ला खान (वय २२, रा. पिराणीपाडा), मोहम्मद शारीक मोहम्मद साबीर शेख (वय २०, रा. शांतीनगर), मेहफुज आलम मुजीबुल्ला खान (वय २९, रा. भिवंडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपीला रंगेहात अटक -

भिवंडी शहरातील शांतीनगर गैबीनगर परिसरात लोकांना आरटीपीसीआर तपासणी न करता कोरोना निगेटिव्ह तसेच पॉझिटिव्ह बनावट रिपोर्ट ५०० रुपये दराने बनवून दिला जात असल्याची गुप्त माहिती भिवंडी गुन्हे शाखा युनिट 2 च्या पोलिसांना मिळाली.

यानंतर भिवंडी युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच भिवंडी मनपाचे वैद्यकीय अधिकारी यांनी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गैबीनगर, पिराणीपाडा, अमजदीया शाळेसमोर असलेल्या महेफुज पॅथॉलॉजीकल लॅबोरेटरी येथे डमी व्यक्ती कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट घेण्यासाठी पाठविले. आरटीपीसीआर तपासणी करीता कोणताही स्वॅब अथवा सॅम्पल न घेता कोरोना निगेटिव्ह बनावट रिपोर्ट थायरोकेअर या नामांकित लॅबच्या लेटरहेडचा वापर करून देताना महेफुज क्लिनिकल लॅब मधील तिघांना रंगेहात पकडले.

६४ व्यक्तीचे आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट दिल्याची कबुली-

महेफुज क्लिनिकल लॅबची झडती घेतली असता कोरोनाचे आरटीपीसीआर तपासणी केलेल्या वेगवेगळ्या एकूण ६४ नागरिकांचे रिपोर्ट मिळून आले. त्यामध्ये ५९ रिपोर्ट हे निगेटिव्ह व ५ रिपोर्ट हे पोझिटिव्ह दिसले. हे बनावट रिपोर्ट बनविल्या प्रकरणी लॅब टेक्नीशियन इनामुलहक उर्फ रब्बानी आणि लॅबचे मॅनेजमेंटचे काम पाहणारा आफताब आलम मुजीबुल्ला खान यांची बारकाईने विचारपुस केली. त्यांनी ६४ जणांचे कोरोना आरटीपीसीआर रिपोर्ट हे लॅबमध्ये मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, संगणक, प्रिंटरच्या सहाय्याने बनावट तयार केलेले असल्याचे कबुली दिली.

परराज्यामध्ये प्रवास करण्यासाठी दिले जात होते अहवाल -

भिवंडी शहरातून परराज्यामध्ये जाण्यासाठी; विमान, रेल्वेने प्रवास करण्याकरीता आणि विविध कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोरोना आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह असणे बंधनकारक आहे. त्यामुळे या आरोपींनी प्रत्येक रिपोर्ट हा कमीत कमी ५०० रुपये एवढ्या दराने बनावट रित्या थायरोकेअर या पॅथॉलॉजीच्या लेटरहेडवर तयार केले. तसेच, यापूर्वी सुध्दा अनेक लोकांना बनावट रिपोर्ट बनवून दिलेले आहेत. हे सर्व रिपोर्ट मेहफुज क्लिनिकाल लॅबचे मालक मेहफुज आलम मुजीबुल्ला खान याच्या सांगण्यानुसार तयार केलेले व लोकांना दिलेले असल्याची कबुली दिली आहे. 64 रिपोर्टसह पडघा परिसरातील कोशींबी येथील साईधारा कम्पांऊड मधील वेगवेगळ्या कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे आरटीपीसीआर तपासणीसाठी घेतलेले एकूण ५८९ स्वब, ४३० आधारकार्डच्या झेरॉक्स, ५६९ आय. सी. एम. आर.चे फॉर्म हे लॅबमध्ये मिळून आले.

लॅबला शासनाची परवानगीच नाही -

शहरातील कामगारांचे आरटीपीसीआर बनावट रिपोर्ट तयार करून विक्री केले असल्याची धक्कादायक माहिती देखील पोलीस तपासात समोर आली. पोलिसांनी भिवंडी मनपा यांच्याकडून माहीती घेतली. मेहफुज क्लीनिकल लॅबोरेटरी यांना आय.सी.एम.आर. किंवा शासनाकडूज कोरोना आरटीपीसीआर तपासणी करण्याची कोणत्याही प्रकाराची परवानगी दिलेली नसल्याची माहिती देखील समोर आली. अधिक तपास भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे करीत आहेत.

Last Updated : Apr 23, 2021, 3:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.