ठाणे - आजच्या डिजीटल युगात नागरिक बऱ्याच वस्तू ऑनलाईन खरेदी करत असतात. मात्र, हीच खरेदी एका युवतीच्या जीवावर बेतली आहे. ऑनलाईन आयुर्वेदिक औषध मागवून त्याचे सेवन केल्यामुळे एका २२ वर्षीय युवतीला जीव गमवावा लागला आहे.
हेही वाचा - 'शिवसेना हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही'
मेघना देवगडकर असे या युवतीचे नाव आहे. ठाण्यातील खोपट परिसरात राहणारी मेघना नृत्यांगणा होती. सडपातळ होण्यासाठी मेघनाने सदर औषध ऑनलाईन मागवले होते. या औषधाच्या सेवनानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती आणखी खालावल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हेही वाचा - 'हे कायद्याचं राज्य, कोणीही हातात दगड तलवार घेण्याची भाषा करू नये'
याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणाबाबत आणखी तथ्य पुढे येऊ शकतात. दरम्यान, या घटनेवर बोलण्यास मेघनाच्या कुटुंबीयांसह पोलिसांनी नकार दिला आहे. अशाप्रकारे ऑनलाईन औषध खरेदी करू नये. शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचे सेवन करू नये, अशी प्रतिक्रिया आता डॉक्टरांमधून उमटत आहे.