ETV Bharat / state

प्रेमविवाह करण्यासाठी प्रेयसीचा प्रियकराच्या मदतीने 13 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

भिवंडी शहरातील कामतघर येथील अष्टविनायक बिल्डिंग मधील फ्लॅटमध्ये दिवसा ढवळ्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लॉक बनावट चवीने उघडून घरातील कपाटासह किचनमधील 13 लाख 21 हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केले होते.

Thane crime
प्रेमविवाह करण्यासाठी प्रेयसीचा प्रियकरच्या मदतीने 13 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
author img

By

Published : Jul 30, 2020, 7:21 AM IST

ठाणे : प्रेमविवाह करण्यासाठी प्रेयसीने घरातीलच १३ लाखांच्या सोन्यांच्या दागिन्यांवर प्रियकराच्या मदतीने डल्ला मारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रियकरासह त्याच्या साथीदाराला नारपोली पोलिसांना शिताफीने बेड्या ठोकण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे या कटात सामील असलेली तरुणी बीएचएमएसच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे.

प्रतीक तुषार लाळे-माने (वय-21) व हेमंत दिलीप सौन्दाणे (वय-21) (दोघेही रा.देवपूर धुळे) असे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी शहरातील कामतघर येथील अष्टविनायक बिल्डिंग मधील फ्लॅटमध्ये दिवसा ढवळ्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लॉक बनावट चवीने उघडून घरातील कपाटासह किचनमधील 13 लाख 21 हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केले होते.

सुवर्णा सोनगीरकर या महिलेने 22 जुलै रोजी नारपोली पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती. या गंभीर घरफोडीचे गांभीर्य लक्षात घेऊन भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे व नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल व्हरकाटे, पोहवा सोनावणे, सातपुते, सोनगीरे , बंडगर, शिरसाठ, ताटे या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तपास करीत असताना बीएचएमएसच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तक्रारदाराच्या मुलीकडे तपासाची दिशा वळवली. तिच्याकडे पोलीस पथकाने अधिक चौकशी केली असता तिच्या बोलण्यातील विसंगती लक्षात आल्यावर पोलिसांचा संशय अधिक बळावला. तिची कसून चौकशी तपास केला असता तिने आपल्या प्रियकर व त्याच्या मित्रा सोबत मिळून कट रचून ही घरफोडी घडवून आणल्याचे कबुली केले.

घरफोडीच्या रक्कमेतून ते दोघे प्रेम विवाह करणार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यावरून पोलीस पथकाने धुळे येथून प्रतीक तुषार लाळे - माने व हेमंत दिलीप सौन्दाणे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून 55 हजार रोख व 8 लाख 96 हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपींमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी, लवकरच तिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती नारपोली पोलिसांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.