ETV Bharat / state

आम्ही आमची हिंमत दाखवली; शिवशिल्पासाठी १० लाखांचा निधी मंजूर, मराठा मोर्चाचा पलटवार

आम्ही आमची हिम्मत दाखवून शिवशिल्पासाठी १० लाखांचा निधी मंजूर करुन घेतला. असे म्हणत सकल मराठा समाजाने ठाणे पालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यावर पलटवार केला.

शिवशिल्पासाठी १० लाखांचा निधी मंजूर
author img

By

Published : Aug 21, 2019, 8:54 PM IST

ठाणे - आम्ही आमची हिम्मत दाखवून शिवशिल्पासाठी १० लाखांचा निधी मंजूर करुन घेतला. पण, त्या निमित्ताने शिवरायांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांची किंमत समस्त ठाणेकरांना दिसली, अशा शब्दात सकल मराठा समाजाने सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यावर पलटवार केला.

ठाणे पालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी, ‘हिम्मत असेल तर आयुक्तांकडे जा असे आव्हान मराठ्यांना दिले होते. त्यावर सकल मराठा समाजाने आज त्यांच्यावर पलटवार केला. शिवशिल्पाच्या दुरुस्तीमध्ये पालिकेकडून दिरंगाई केली जात आहे. या संदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना नरेश म्हस्के यांनी चिल्लर असे संबोधून धक्काबुक्की केली होती. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन या शिवशिल्पासाठी निधी मंजूर करुन घेतला. या संदर्भात मराठा मोर्चाची भूमिका मांडण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत कैलाश म्हापदी यांनी ही टीका केली. यावेळी रमेश आंबरे, अ‍ॅड. संतोष सूर्यराव, दत्ता चव्हाण, अविनाश पवार, अजय सकपाळ, दीपक पालांडे आदी उपस्थित होते.

यावेळी कैलाश म्हापदी म्हणाले, की शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर येणाऱ्या या लोकांना आपल्या नजरेसमोर पडझड झालेले शिवशिल्प दिसत नाही, हे दुर्देवं आहे. प्रशासनाकडून काम करुन घेणे हे सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य असते. मात्र, ते जमत नसल्यामुळेच सनदशीर आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जात आहे. सर्वात गंभीर म्हणजे, महापौरांना भेटण्यासाठी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी गेलेले असताना त्यांच्या दालनात येऊन अशा पद्धतीने दादागिरी करणे सभागृह नेत्याला शोभणारे नाही.

आम्ही शिवशिल्पाच्या दुरुस्तीची मागणी करायला गेलो होतो. मात्र, त्यांनी ही मागणी जाणून घेण्याआधीच हाणामारीची भाषा केली. यावरुन या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल किती प्रेम आहे, हे दिसून येत असल्याचे म्हापदी म्हणाले. मते मागण्यासाठी मराठा समाजाच्या दारात येणारे हे लोक आज शिवरायांच्या वैचारिक वारसांना ‘चिल्लर’ असे म्हणत असतील तर त्याचा हिशोब आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना चिल्लरच मोजायला लावू असे यावेळी समन्वयकांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या चित्रशिल्पाचा अवमान होत असताना पालिकेतील सत्ताधाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा काहीही अधिकार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या सत्ताधार्यांना आलेला माज मराठा समाज उतरविल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा म्हापदी यांनी दिला.

शिवसेनेने आधी माफी मागावी
निवेदन द्यायला आलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना शिव्या देऊन धक्काबुक्की केली. मराठा मोर्चाला चिल्लर म्हटलं. या प्ररकणी शिवसेनेनं माफी मागावी, असा स्पष्ट इशारा मोर्चाने दिला आहे. कसोटीच्या क्षणी आम्ही सेनेसोबत निष्ठेने राहिलो. त्याचा आज आम्हाला पश्चाताप होत असल्याच म्हापदी म्हणाले. हात जोडून उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली. त्यांना सोडण्याची भाषा झाली. मात्र, याच महापौरांच्या दालनातून सर्वांसमोर कृष्णा पाटील नावाच्या भाजप नगरसेवकाला मानगुटीला धरून बाहेर नेले. तेव्हा या मर्दांची मर्दुमकी कुठे गेली होती, असा सवालही म्हापदींनी केला.

Intro:आम्ही आमची हिम्मत दाखवली; अन् सभागृह नेत्यांची
किमंत ठाणेकरांनी पाहिलीमराठा मोर्चाचा पलटवारBody:

ठामपाचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी, ‘हिम्मत असेल तर आयुक्तांकडे जा असे आव्हान मराठ्यांना दिले होते. आम्ही आमची हिम्मत दाखवून शिवशिल्पासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करुन घेतला. पण, त्या निमित्ताने शिवरायांच्या नावावर राजकारण करणार्यांची किमंत समस्त ठाणेकरांना दिसली, अशा शब्दात सकल मराठा समाजाने पलटवार केला आहे.
शिवशिल्पाच्या दुरुस्तीमध्ये ठामपाकडून दिरंगाई केली जात आहे. या संदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्यांना नरेश म्हस्के यांनी चिल्लर असे संबोधून धक्काबुक्की केली होती. त्यानंतर या पदाधिकार्यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन या शिवशिल्पासाठी निधी मंजूर करुन घेतला. या संदर्भात मराठा मोर्चाची भूमिका मांडण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत कैलाश म्हापदी यांनी ही टीका केली. यावेळी रमेश आंबरे, अ‍ॅड. संतोष सूर्यराव, दत्ता चव्हाण, अविनाश पवार, अजय सकपाळ, दीपक पालांडे, धनंजय समुद्रे, प्रवीण कदम, सुजय हुले, अतुल मालुसरे आदी उपस्थित होते.
कैलाश म्हापदी म्हणाले, शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर येणार्या या लोकांना आपल्या नजरेसमोर पडझड झालेले शिवशिल्प दिसत नाही, हे दुर्देवं आहे. प्रशासनाकडून काम करुन घेणे हे सत्ताधार्यांचे कर्तव्य असते. मात्र, ते जमत नसल्यामुळेच सनदशीर आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करणार्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जात आहे. सर्वात गंभीर म्हणजे, महापौरांना भेटण्यासाठी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी गेलेले असताना त्यांच्या दालनात येऊन अशा पद्धतीने दादागिरी करणे सभागृह नेत्याला शोभणारे नाही.
आम्ही शिवशिल्पाच्या दुरुस्तीची मागणी करायला गेलो होतो. मात्र, त्यांनी ही मागणी जाणून घेण्याआधीच हाणामारीची भाषा केली. यावरुन या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल किती प्रेम आहे, हे दिसून येत आहे. मते मागण्यासाठी मराठा समाजाच्या दारात येणारे हे लोक आज शिवरायांच्या वैचारिक वारसांना ‘चिल्लर’ असे म्हणत असतील तर त्याचा हिशोब आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना चिल्लरच मोजायला लावू असे यावेळी समन्वयकांनी सांगितले. पण, महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या चित्रशिल्पाचा अवमान होत असताना उघड्या डोळ्याने ते पाहणार्या ठामपातील सत्ताधार्यांना सत्तेवर राहण्याचा काहीही अधिकार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या सत्ताधार्यांना आलेला माज मराठा समाज उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही म्हापदी यांनी दिला.

आधी माफी मागा
निवेदन द्यायला आलेल्या कार्यकर्त्यांना शिव्या देऊन धक्काबुक्की केली. मराठा मोर्चाला चिल्लर म्हटलं. या प्ररकणी शिवसेनेनं माफी मागावी, असा स्पष्ट इशारा मोर्चानं दिला. कसोटीच्या क्षणी आम्ही सेनेसोबत निष्ठेने राहिलो. त्याचा आज आम्हाला पश्चाताप होतोय, असंही म्हापदींनी स्पष्ट केलं.
तेव्हा मर्दुमकी कुठे गेली होती?
हात जोडून उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली. त्यांना सोडण्याची भाषा झाली. मात्र याच महापौरांच्या दालनातून सर्वांसमक्ष कृष्णा पाटील नावाच्या डॅशिंग भाजपा नगरसेवकाला मानगुटीला धरून बाहेर नेलं गेलं तेव्हा या मर्दांची मर्दुमकी कुठे गेली होती, असा सवालही म्हापदींनी केला.
Byte कैलास म्हापदी मराठा समाज नेतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.