ETV Bharat / state

पोलिसांना आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा आरोपी अटकेत

प्राणघातक हल्ला करुन सुमारे आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फिरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट - 1 ने आरोपीस अटक करुन भांडुप पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

आरोपीसह पोलीस पथक
आरोपीसह पोलीस पथक
author img

By

Published : Dec 17, 2020, 10:48 PM IST

ठाणे - जुन्या भांडणाचा राग मनात धरून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तक्रारदार जावेद याच्यावर ब्लेड आणि बर्फ फोडण्याच्या टोचाणे प्राणघातक हल्ला करून आरोपी तौसिफ अश्रफ इनामदार (वय 27 वर्षे) हा मुंबई पोलिसांना गुंगारा देत होता. हा आरोपी ठाण्याच्या मुसरोड येथे आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला पुढील तपासासाठी भांडुप पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

तक्रारदार जावेद याच्यावर 2 फेब्रुवारी, 2020 रोजी आरोपी आवेझ इनामदार, फिरोज उर्फ चिकन, नबिराजन कोणार आणि तौसिफ इनामदार यांनी हल्ला केला. मुलुंड गोरेगाव लिंक रोडवरील लजीज हॉटेल येथे जावेदचे चार आरोपींसोबत भांडणे झाले होते. त्याचाच राग मनात घरून चौघांनी जावेद याच्यावर 2 फेब्रुवारीला मध्यरात्रीनंतर ब्लेड आणि टोचाच्या सहायाने हल्ला केला. यात जावेद हा गंभीर जखमी झाला. चार आरोपींच्या विरोधात भांडुप पोलीस ठाण्यात भा.दं.वि. 30, 324, 323, 504, 506 (2) आणि 34 नुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली होती. मात्र, गुन्हा घडल्यापासून आरोपी तौसिफ अश्रफ इनामदार हा फरार होता. तर आठ महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तो आरोपी मूस चौक स्टेशन रोड येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस नाईक अमोल देसाई यांना मिळाली त्यानुसार सापळा रचून पोलीस पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळून भांडुप पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा - टोइंग ऑपरेटर्सच्या कामात शिस्त आणण्यासाठी वाहतूक शाखेचा नियमांचा बडगा

हेही वाचा - ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांना 'खाकी'चा झटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.