ETV Bharat / state

संपत्तीवर डोळा ठेवून २ भावांचा सख्ख्या बहिणींशी लग्नाचा बनाव उघड; आई-वडिलांसह दोघे भाऊ गजाआड

दोघा भावांपैकी एकाचे आधीच लग्न झालेले असतानाही आरोपी दबडे कुटुंबीयांनी संगनमत करून फसवणूक केली. या प्रकरणी ४ जणांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आईवडिलांसह दोन्ही तरुणांना गजाआड करण्यात आले आहे.

आरोपी
author img

By

Published : Mar 2, 2019, 6:36 PM IST

ठाणे - प्रॉपर्टीवर डोळा ठेवून २ भावांनी सख्ख्या बहिणींशी केलेला लग्नाचा बनाव उघडकीस आला आहे. आरोपींनी पैशांच्या आमिषाने भिवंडीतील एका सामाजिक महिला कार्यकर्तीच्या २ मुलींशी साखरपुडा केला. तसेच लग्नासाठी हुंडा म्हणून २ लाख रुपये रोख आणि दीड लाख रुपयांचे ५ तोळ्यांचे दागिने असा साडेतीन लाखांचा ऐवज हडप करून लग्नास नकार दिला आहे.

विशेष म्हणजे दोघा भावांपैकी एकाचे आधीच लग्न झालेले असतानाही आरोपी दबडे कुटुंबीयांनी संगनमत करून फसवणूक केली. या प्रकरणी ४ जणांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आईवडिलांसह दोन्ही तरुणांना गजाआड करण्यात आले आहे. गणेश बाळासाहेब दबडे (२४), विकास दबडे (२२), वनिता दबडे (४५), बाळासाहेब तातोबा दबडे (५२, सर्व राहणार, हनुमान नगर, कांदिवली) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी भिवंडी शहरातील अंजूरफाटा येथे राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुनिता (नाव बदलून) यांच्याशी संपर्क करून त्यांच्या दोन्ही मुलींना लग्नाची मागणी घातली. मुलींच्या पसंतीनंतर लग्नासाठी हुंडा म्हणून एका मुलास १ लाख ५१ हजार रुपये व ५ तोळे सोने घेतले. त्यानंतर ३ जानेवारी २०१९ ला साखरपुड्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पाडला. दरम्यान आरोपी कुटुंबाने सुनिता यांच्या संपत्तीवर डोळा ठेवून त्यांच्याकडे येणे जाणे सुरू केले.

undefined

दोन्ही मुलींचे आपल्या भावी पतींसोबत मोबाईलवर बोलणेही सुरू झाले. मात्र, बाळासाहेब दबडे यांनी अचानकपणे सुनिता यांना माझा मुलगा गणेशला तुमची मुलगी पसंत नसल्याचे सांगत लग्नाला नकार दिला. त्यामुळे सुनिता यांनी मानसिक धक्का बसला. त्यानंतर सुनिताच्या कुटुंबाने दबडे कुटुंबीयांची माहिती काढली असता, आरोपी गणेश दबडे याचे वर्षभरापूर्वीच मिरज येथील एका मुलीशी लग्न झाल्याचे समजले. त्यामुळे सुनिता यांच्या कुटुंबाने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

दरम्यान, लहान मुलीला दबडे कुटुंबाने लग्न मोडल्याचे सांगितले असता त्यामुळे मानसिक धक्का सहन न झाल्याने तिने १८ फेब्रुवारीला रात्री विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा गंभीर प्रकार असल्याचे सुनिता यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेवून लबडे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी भारतीय दंड विधान ४२०, ४०६ (३४) प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी गणेश, विकास, वनिता, बाळासाहेब दबडे यांना तत्काळ अटक करत न्यायालयात हजर केले. आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाजन करत आहेत.

Intro:हिंगोली जिल्हा हा सर्वच बाबतीत मागासलेला आहे. मात्र अशाही स्थितीत जिल्ह्यात असलेल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहात मात्र स्वचतेचे तीन तेरा वाजले आहेत. चक्क शौचालयाचे पाणी बोअर मध्ये मुरते अन त्याच पाण्याने विध्यार्थ्याना इच्छा नसूनही स्नान करण्याची वेळ येत आहे. हा खळबळजनक प्रकार आज उघड झाला. अनेकदा तक्रारी करूनही प्राचार्याने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. तर कोणी तक्रारी करण्यासाठी पुढे आलेच तर त्यांचे प्रात्यक्षिकाचे गुण कमी करण्याची भीती दाखविली जाते.

Body:हिंगोली जिल्ह्यात औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या तंत्र निकेतन महाविद्यालयामुळे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना फायदा झाला. मात्र या ठिकाणी निवासी असलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. उच्च शिक्षणासाठी शासन कोट्यावधी निधी खर्च करत असला तरीही तो निधी विद्यार्थ्यापर्यंत होच विलाज जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना बकाल अवस्थेत जीवन जगावे लागत आहे. तंत्रनिकेतन महाविद्यालयात असलेल्या वसतिगृहात १४० विध्यार्थी आहेत. तर मुलीच्या वसतिगृहात २४ विध्यर्थिनी वास्तव्यास आहेत. मात्र विद्यार्थ्यांनाच अनेक अडचणीला तोंड द्यावे लागते. मुलांच्या वसतिगृहातील प्रत्येक चेंबर ब्लॉक झाले असून वॉटर हार्वेस्टिंग साठी करण्यात आलेल्या प्रक्रियेत शेताचे तर कधी पाणी साचले नाही मात्र शौचालयाची पाणी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साचले तेच पाणी त्या ठिकाणी हार्वेस्टिंग होऊन बोर मध्ये उतरते आणि त्याच बोरचे पाणी विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी वापरण्याचा खळबळजनक प्रकार या महाविद्यालयात आढळून आला विद्यार्थ्यांनी अनेकदा तोंडी सांगितले. मात्र अजूनही दखल घेतली नाही.

Conclusion:उलट या सुविधाकडे दुर्लक्षच केले गेले. शिवाय परिसरात असलेले भोजनालय ही दुर्गंधीच्या विळख्यात सापडलेले आहे. परिसरात एवढी भयंकर दुर्गनधी सुटली आहे. त्या मुळे विध्यार्थ्याना घास ही घशातून खाली उतरत नाही. मात्र या विद्यार्थ्यांना कोणी वालीच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे विध्यार्थी निमूटपणे हा त्रास सहन करून घेत आहेत. संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी या विषयावर बोलण्याचे तर टाळलेच. शिवाय वेगवेगळी करणे सांगून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जात होता. कधी नगर पलीकडे तर कधी साबाला पत्रव्यवहार केल्याचे सांगितले होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.