ETV Bharat / state

जलयुक्त शिवार योजनेतील सरकारीबाबूचा घोटाळा गावकऱ्यांनी केला उघड! - ठाणे

जुन्याच विहिरींवर डागडुजी करून त्या जलयुक्त शिवार योजनेच्या विहिरी दाखवण्याचा घाट सरकारीबाबूंनी घातल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

जलयुक्त शिवार योजनेतील विहीर
author img

By

Published : Mar 2, 2019, 6:39 PM IST

Updated : Mar 2, 2019, 10:23 PM IST

ठाणे - मुरबाड तालुक्यातील सासणे येथील सतर्क गावकऱ्यांमुळे जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे जुन्याच विहिरींवर डागडुजी करून त्या जलयुक्त शिवार योजनेच्या विहिरी दाखवण्याचा घाट सरकारीबाबूंनी घातल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

जलयुक्त शिवार योजनेतील सरकारीबाबूंचा घोटाळा गावकऱ्यांनी उघड केलाय.

मुरबाडमध्ये अधिकारी वर्ग टक्केवारीच्या हव्यासापोटी या योजनेला हरताळ फासण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मुरबाड मधीलसासणे गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जवळपास ५० लाख रूपये निधी हा खर्च करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत चार विहिरींना अनुक्रमे ८ लाख ७६ हजार, ८ लाख ४९ हजार, ८ लाख ४४ हजार व ८ लाख ६१ हजार तसेच के. टी. बंधारा दुरुस्तीसाठी ४ लाख ६० हजार, बांधबंधीस्ती ३ लाख ५८ हजार इतका निधी मंजूर झाला आहे.

शासनाचा हा निधी पाण्यावर खर्च होत असताना येथील नागरिकांना मात्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या गावातील नळपाणी पुरवठा योजना गेली दीड वर्ष बंद आहे. त्यामुळे हातपंपावर पाणी भरून येथील महिला मेटाकुटीला आल्या आहेत. सासणेगावात चार विहिरी असून या विहिरींमध्ये बऱ्यापैकी पाणी साठा आहे. मात्र, आता याच विहिरीत भुसुरुंग लावून त्यावर नव्याने बांधकाम करून त्याच या योजनेच्या विहिरी दाखवण्याचा प्रयत्न सध्या अधिकारी वर्गाकडून सुरू आहे.

ठेकेदार आणि अधिकारी यांनी आर्थिक फायद्यासाठी हा घाट घातल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तर या जुन्या विहिरींमध्ये भूसुरुंग स्फोट घडवल्यास या विहिरींचेही पाणी नष्ट होण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. जुन्या विहिरी तशाच ठेऊन जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नव्याने जलस्रोत तयार करावेत, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. तसे न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही येथील गावकऱ्यांनी दिला आहे.

undefined

---------- Forwarded message ---------
From: Siddharth Kamble <siddharth.kamble@etvbharat.com>
Date: Fri, Mar 1, 2019 at 4:18 PM
Subject: जलयुक्त शिवार योजनेतील सरकारीबाबूचा घोटाळा गावकऱ्यांनी केला उघड !
To: Manoj Joshi <manoj.joshi@etvbharat.com>, Marathi Desk <marathidesk@etvbharat.com>

जलयुक्त शिवार योजनेतील सरकारीबाबूचा घोटाळा गावकऱ्यांनी केला उघड ! 

ठाणे :-मुरबाड तालुक्यातील सासणे येथील सतर्क गावकऱ्यांमुळे या जनहितार्थ  योजनेचा घोटाळा झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे जुन्याच विहिरींवर डागडुजी करून त्या जलयुक्त शिवार योजनेच्या विहिरी दाखवण्याचा घाट सरकारीबाबू घातल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून २ वर्षापासून राबवत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला मुरबाडमध्ये अधिकारी वर्गांने टक्केवारीच्या हव्यासापोटी हरताळ फासण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मुरबाड मधील  सासणे गांवात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जवळपास पन्नास लाख रूपये निधी हा खर्ची घालणण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत चार विहिरींवर अनुक्रमे ८ लाख ७६ हजार, ८ लाख ४९ हजार, लाख ४४  हजार, व ८ लाख ६१ हजार इतका त्याच बरोबर के. टी. बंधारा दुरुस्ती ४  लाख ६०  हजार, बांधबंधीस्ती ३ लाख ५८  हजार इतका निधी मंजूर झाला आहे. हा शासनाचा मंजूर निधी पाण्यावर खर्च होत असताना मात्र येथील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या गावातील नळपाणी पुरवठा योजना गेली दीड वर्ष बंद आहे. त्यामुळे हातपंपावर पाणी भरून इथल्या महिला मेटाकुटीला आल्या आहेत.

सासणे  गावात चार विहिरी असून या विहिरींमध्ये बऱ्यापैकी पाणी साठा आहे. मात्र आता याच विहिरीत भुसुरुंग लावून त्यांवर नव्याने बांधकाम करून त्याच या योजनेच्या विहीरी दाखवण्याचा प्रयत्न सध्या अधिकारी वर्गाकडून सुरू आहे. केवळ ठेकेदार आणि अधिकारी यांनी आर्थिक फायद्यासाठी हा घाट घातल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तर या जुन्या विहिरींमध्ये भूसुरुंग स्फोट घडवल्यास या विहिरींचेही पाण्याचे उद्भव नष्ट होण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. जुन्या विहिरी तशाच ठेउन जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नव्याने जलस्रोत तयार करावेत अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. तसे नं झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही येथील गावकऱ्यांनी दिला आहे.

Last Updated : Mar 2, 2019, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.