ETV Bharat / state

धक्कदायक..! घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - चॉकलेट

घशात चॉकलेट अडकल्याने श्वान घेण्यास त्रास सुरु झाला. गुदमरल्यामुळे चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ऋषी लसणे
ऋषी लसणे
author img

By

Published : Apr 1, 2020, 8:31 PM IST

ठाणे - घराच्या अंगणात आजी-आजोबांसोबत खेळताना दुकानातून आणलेले चॉकलेट खाल्ले. ते घशात अडकल्याने श्वास गुदमरून एका चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील पारिवली येथे घडली आहे. ऋषी सचिन लसणे (वय 4 वर्षे), असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत ऋषी हा मंगळवारी (दि. 31 मार्च) सायंकाळच्या सुमारास अंगणात खेळत होता. त्यावेळी त्याला आजीने घराजवळ असलेल्या दुकानातून काडीपेटी आणण्यास सांगितली होती. काडीपेटीसह त्याने याच दुकानावरून येताना चॉकलेट देखील आणले होते. दुकानातून येऊन तो पुन्हा खेळत होता. मात्र, थोड्याच वेळात त्याने आजीकडे येऊन माझ्या घशात काहीतरी अडकले आहे, असे सांगितले. त्यानंतर त्याचा श्वास गुदमरून तो बेशुद्ध झाल्याने कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी प्रथम अनगांव येथे नेले. मात्र, प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्याला भिवंडीतील सेंट्रल, सिराज व स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ऋषीचा मृत्यू झाल्याचे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, ऋषीच्या मृत्यूविषयी कुटुंबियांनी काहीही शंका उपस्थित केली नसल्याने स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याचे शवविच्छेदन केले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - मुंबई नाशिक महामार्गावर अपघात.. आईच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या व्यक्तीचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.