ठाणे : मे महिना अर्ध्यावर आला असून पुढच्या महिन्यापासून पावसाला सुरूवात होणार आहे. गेल्या काही वर्षांत ठाणे शहारत पावसाळ्यात इमारती कोसळण्याचा घटना घडल्या आहेत. याच अनुषंगाने पालिका प्रशासनाकडून दरवर्षी शहारातील धोकादायक इमारती सर्वेक्षण करण्यात येते. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी तयार करण्याचे काम प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात आले आहे. जवळजवळ यादी निश्चित करण्यात आली आहे. यानुसार ८४ इमारती अतिधोकादायक तर १७५ इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. तर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावसाळ्यापूर्वी इमारतीचे सर्व्हे केले जात आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी तयार करण्याचे काम प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात आले आहे. - ठाणे महापालिका
इमारतींचे सर्वेक्षण सुरू: गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यात अतिधोकादायक, धोकादायक इमारतींचा प्रश्न भेडसावत आहे. वागळे इस्टेट, नौपाडा, कळवा, मुंब्रा, दिवा याच बरोबर घोडबंदर येथे बेकायदा बांधकामे उभी ठाकली आहेत. तर काही ठिकाणी मोडकळीस आल्याने इमारतीचे प्रमाण जास्त आहे. अश्या इमारती पावसाळयात कोसळून जीवितहानी झाल्याचे प्रकार घडत असतात. अश्या घटनांना आळा बसण्यासाठी पूर्वउपायोजना किंवा सतर्क राहण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने प्रभाग समितीनुसार इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येत असते. यामध्ये सी-१, सी-२ ए, सी२बी आणि सी ३ अशा चार टप्प्यांत धोकादायक इमारतींचे वर्गीकरण करण्यात येते. यामध्ये अति धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे इतरत्र पुनर्वसन करून त्या इमारतींचे बांधकाम पाडण्यात येते. यंदाही महापालिका प्रशासनाने अशाप्रकारे शहरातील धोकादायक इमारतींची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
५२ इमारती अतिधोकादायक अवस्थेत: कोपरी प्रभाग समिती क्षेत्रामध्ये सर्वात जास्त म्हणजेच, ५२ इमारती अतिधोकादायक अवस्थेत असल्याची यादी मध्ये नोंद करण्यात आली आहे. तर चक्क वागळे इस्टेट आणि दिवा प्रभाग समिती हद्दीमध्ये शून्य इमारती अतिधोकादायक असल्याने आश्यार्य व्यक्त केले जात आहे. तर कळव्यात फक्त ४ इमारती अतिधोकादायक असल्याने नोंद करण्यात आली आहे.
चार टप्यात वर्गीकरण कसे ? : सी-१ म्हणजे राहण्यास योग्य नाही, तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे, सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आणि सी-३ म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे असे चार टप्यात वर्गीकरण केले जात आहे. तशी सूचना पालिका प्रशासनाकडून इमारतींना देण्यात येते.
मुंब्र्यात इमारतींना सर्वात जास्त धोका : ठाणे पालिकेने हद्दीत प्रभाग निहाय धोकादायक इमारतीचे वर्गीकरण करण्यात आले आहेत. एकूण चार टप्प्यात वर्गीकरण करण्यात आले आहे. मुंब्र्यात सर्वात जास्त धोका असल्याचे यादीत दिलेल्या आकडेवारी निष्पन्न झाले आहे. तर एकट्या मुंब्रा प्रभाग समिती हद्दीत सी-१, सी-२ ए , सी२बी आणि सी ३ नुसार एकूण १३४० इमारतीना सर्वात जास्त धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -