ETV Bharat / state

ठाणे: घराचे स्वप्न पाहणाऱ्या शेकडो ग्राहकांची फसवणूक; कोट्यवधींचा गंडा घालून बिल्डर चौकडी फरार - पटेल कोलेसिस कल्याण

कल्याण पश्चिमेकडील बिर्ला महाविद्यालयासमोर पटेल ग्रुप ऑफ कंपनीचा  मालक हसमुख पटेल याने 230 पेक्षा जास्त नवीन ग्राहक तर म्हाडा वसाहतींमधील 448 ग्राहकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. म्हाडाच्या वसाहतीचा पुनर्विकास कामाबरोबरच नियोजित नवीन इमारतही बांधून पूर्ण होईल, असे आश्वासन ग्राहकांना देण्यात आले होते.

अर्धवट बांधकाम झालेली इमारत
author img

By

Published : Nov 19, 2019, 9:42 PM IST

ठाणे - कल्याणमध्ये शेकडो ग्राहकांना घराचे स्वप्न दाखवत घराचा ताबा न देणाऱ्या बिल्डर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोट्यावधींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच बिल्डरांची चौकडी फरार झाली आहे. हसमुख पटेल, जिग्नेश मनियार, रितू वासनिक, राज गोपालन अशी फरार बिल्डर्सची नावे आहेत.

घराचे स्वप्न पाहणाऱ्या शेकडो ग्राहकांची फसवणूक

कल्याण पश्चिमेकडील बिर्ला महाविद्यालयासमोर पटेल ग्रुप ऑफ कंपनीचा मालक हसमुख पटेल याने 230 पेक्षा जास्त नविन ग्राहक तर म्हाडा वसाहतींमधील 448 ग्राहकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. म्हाडाच्या वसाहतीचा पुनर्विकास कामाबरोबरच नियोजित नविन इमारतही बांधून पूर्ण होईल, असे आश्वासन ग्राहकांना देण्यात आले होते. तसेच एफएसआयच्या आधारे काही सदनिकांची विक्री करण्यात आली.

हेही वाचा - ठाण्यात जळीतकांड.. अज्ञात माथेफिरूने सोसायटीच्या पार्कींगमधील वाहने जाळली

ग्राहकांना दिलेल्या आश्वासनानुसार 2017पर्यंत ग्राहकांना सदनिकांचा ताबा मिळणे अपेक्षित होते. मात्र, 2019 उजाडले तरी अद्याप बांधकामही पुर्ण झालेले नाही. त्यामुळे ग्राहकांना भरलेली रक्कम परत मागे हवी आहे. तर इतके दिवस मोठी रक्कम अडकून राहिल्याने काही ग्राहकांना व्याजासहित पैसे हवे आहेत. याबाबत 11 जणांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात पटेल ग्रुप ऑफ कंपनी विरोधात मागील आठवड्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा - इकबाल मिर्चीच्या संपत्तीचा लिलाव तुर्तास थांबला; बोली लावणाऱ्यांना रक्कम मान्य नाही

दरम्यान, म्हाडाची मालकी असलेल्या या भूखंडावर अनेक वर्षांपासून 448 कुटुंबे राहत होती. म्हाडाने हा भूखंड पटेल ग्रुप ऑफ कंपनीला पुनर्विकासासाठी दिला. त्यानंतर मोठा गाजावाजाकरून या भूखंडावर 'पटेल कोलेसिस' या नावाने टोलेजंग इमारती उभारण्यात सुरुवात केली होती. त्यामुळे शेकडो ग्राहकांनी पटेल कोलेसिसमध्ये सदनिका बुक केल्या. यामध्ये व्यापारी, नोकरदार वर्ग तर तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची 24 लाखांना फसवणूक झाली आहे.

फसवणूक झालेल्या ग्राहकांनी रेरा कायद्यांतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. फरार बिल्डरांच्या चौकडीला तातडीने अटक करण्यात यावी, अशी अपेक्षा ग्राहकांना आहे.

Intro:kit 319

Body:( विशेष महत्त्व बातमी)घरांचे स्वप्न पाहणाऱ्या शेकडो ग्राहकांची फसवणूक; कोट्यावधींचा गंडा घालत बिल्डरांची चौकडी पसार

ठाणे : कल्याणात शेकडो ग्राहकांना घरांचे स्वप्न दाखवात घरांचा ताबा न देणाऱ्या बिल्डर विरोधात कोट्यावधींची फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच बिल्डरांची चौकडी फरार झाली आहे .यामुळे घरांचे स्वप्न पाहणाऱ्या शेकडो ग्राहकांनी 'कुणी घर देता का घर' असा 'आक्रोश करीत फरार बिल्डरांच्या चौकडीला तातडीने अटक करून सरकारकडून न्यायाची अपेक्षा केली आहे. हसमुख पटेल, जिग्नेश मनियार रितू वासनिक राज गोपालन अशी कोट्यवधींची फसवणूक करून फरार झालेल्या बिल्डरांच्या चौकडीचे नावे आहेत.
कल्याण पश्चिमेकडील बिर्ला महाविद्यालय समोर पटेल ग्रुप ऑफ कंपनी चा बिल्डर हसमुख पटेल यांनी 230 पेक्षा अधिक सदनिका ग्राहकांसह म्हाडा वसाहतींमधील 448 धारकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. म्हाडाच्या वसाहतीचे पुनर्विकास करण्याबरोबरच इमारत बांधून पूर्ण होईल, असे आश्वासनही या ग्राहकांना वेळोवेळी देण्यात आले होते. तसेच एफएआयच्या आधारे काही सदनिकांची विक्री करण्यात आली, मात्र मागील दोन वर्षापासून म्हाडातील 448 कुटुंबीयांना पटेल ग्रुप तर्फे देण्यात येणारे मासिक भाडे बंद करण्यात आल्याने सदनिकाधारकांनी आक्रोश करीत घर लवकरात लवकर ताब्यात मिळावे अशी मागणी केली. दुसरीकडे ट्रायपार्टी एग्रीमेंटमध्ये दिलेला अटी आणि शर्तीचा नियमित व्याज भरणा न केल्याने फसवणूक झालेल्या 11 जणांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात पटेल ग्रुप ऑफ कंपनी विरोधात मागील आठवड्यात तक्रार दाखल केली .
दरम्यान , म्हाडाचा असलेल्या या भूखंडावर गेल्या अनेक वर्षांपासून 448 कुटुंबे राहत होती , मात्र हा भूखंड म्हाडाने पटेल ग्रुप ऑफ कंपनीला पुनर्विकासासाठी दिला त्यानंतर मोठा गाजावाजा करीत या भूखंडावर पटेल कोलेसिस या नावाने टोलेजंग इमारती उभारण्यात सुरुवात केली होती ,त्यामुळे शेकडो ग्राहकांनी पटेल कोलेसिसमध्ये घरे बुक केले. यामध्ये व्यापारी, बडा नोकरदार वर्ग असून एक तर तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी आहेत, त्यांचीही 24 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे, तर बिल्डरांनी शेकडो घरांचा ताबा ग्राहकांना अध्यापही दिला नसून फसवणूक झालेल्या आणखी काहीजणांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन हसमुख पटेल, जिगणेश मणियार, रितू वासनिक , राज गोपालन अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले, तर फसवणूक झालेल्या ग्राहकांनी रेरा कायद्या अंतर्गत ही तक्रार दाखल केली असून या तक्रारीवर अद्यापही निर्णय झालेला नसल्याने शेकडो ग्राहकांचे घराचे स्वप्न अध्यनतरीत लटकले आहे.

Conclusion:कल्याण
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.