ETV Bharat / state

१८ लाखाची खासगी बस लंपास करणारे चौघे गजाआड - Transport company

एका ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाची १८ लाखांची खासगी बस पळून नेणाऱ्या चार जणांच्या टोळीला कोनगाव पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले आहे. या चोरट्यांकडून बसही हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चारही आरोपी मूळचे झारखंड राज्यातील असून ते एका चाळीच्या खोलीत भाड्याने राहत होते.

आरोपी अटकेत
आरोपी अटकेत
author img

By

Published : May 2, 2021, 7:09 PM IST

Updated : May 2, 2021, 8:44 PM IST

ठाणे - एका ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाची १८ लाखांची खासगी बस पळून नेणाऱ्या चार जणांच्या टोळीला कोनगाव पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले आहे. या चोरट्यांकडून बसही हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चारही आरोपी मूळचे झारखंड राज्यातील असून ते एका चाळीच्या खोलीत भाड्याने राहत होते.

रमीज गुलाम सैय्यद (वय-२६, रा. रा. पडघा- बोरीवली, ता. भिवंडी) आलीम नागोमियाँ अन्सारी (वय-३४, रा. मानकोली, ता. भिवंडी) मोजिम हुसैनमियाँ अन्सारी (वय-४६, रा. मानकोली, ता. भिवंडी) रूस्तम नूरमोहम्मद अन्सारी (वय-३९ , रा. मानकोली, ता. भिवंडी) असे बस लंपास करणाऱ्या चोरट्यांची नावे आहे.

जीपीएसमुळे चोरट्यांसह बसचा लागला सुगावा

ठाण्याच्या माजिवडा परिसरात राजेश शुरप्पा पुजारी (वय-५४) हे राहतात. त्यांचा कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुजारी नावाने ट्रान्सपोर्टचे आहे. काल (शनिवार) मध्यरात्री १ वाजल्याच्या सुमारास त्यांची बस चोरटयांनी पळवली होती. त्यानंतर त्यांनी बस चोरीची तक्रार कोनगाव पोलीस ठाण्यात नोंद केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. विशेष म्हणजे चोरीला गेलेल्या बसमध्ये जीपीएस ट्राकर यंत्रणा लावल्याचे पोलीस पथकाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ही बस ही नारपोली पोलीस ठाणे हद्दीत मानकोली परिसरात फिरत असल्याचे बसमध्ये लावलेल्या जीपीएस ट्रॅक यंत्रणामध्ये तपास अधिकारी जीवन शेरखाने यांना दिसून आले.

माणकोली परिसरात पोलिसांनी रचला सापळा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेरखाने, पोलीस निरीक्षक मासरे, कृष्णा महाले, गणेश चोरगे यांनी नारपोली पोलिस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक चौधरी यांच्या मदतीने माणकोली परिसरात सापळा रचून पोलीस पथकाने बसचा शोध घेतला.

Last Updated : May 2, 2021, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.