ठाणे - जंगलात तरुणीचा मृतदेह आढळून ( Found Girls Dead body In Kasara Forest ) आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना कसारा जवळच्या जंगलात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आढळून आल्याची माहिती कसारा पोलिसांनी आज सकाळी दिली आहे. तरुणीच्या मृतदेहावर चाकुचे ( Knife Attack Mark On Girls Dead Body ) अनेक वार आढळल्याने हा खुनाचा प्रकार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.
जंगलात रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह ठाणे जिल्ह्यातील कसारा ग्रामीण पोलिसांना ( Rural Police Station Thane ) गुरुवारी सायंकाळी कसारा नजीकच्या जंगल भागातील रस्त्याच्या कडेला २१-२५ वयोगटातील एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती कसारा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कसारा नजीकच्या वारली करंजपाडा गावातील जंगलात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला तरुणीचा मृतदेह एका प्रवाशाच्या नजरेस पडला होता. त्यानंतर त्याच प्रवाशाने मृतदेहाविषयी माहिती कसारा पोलिसांना दिली. माहिती मिळताच गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत तरुणीचा मृतदेह शहापूरमधील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात ( Govt Upazila Hospital Thane ) शवविच्छेदनासाठी रवाना केला.
तरुणीच्या शरीरावर चाकूने वार तरुणीच्या शरीरावर चाकूने वार केलेल्या अनेक जखमा पोलिसांना आढळून आल्या आहेत. त्यानंतर कसारा पोलीस ठाण्यात खून करणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. मात्र ही तरुणी कोठून आली, तिची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात रस्त्याच्या कडेला असलेल्या निर्जनस्थळी फेकून देण्यामागचा हेतू काय आहे. याचा तपास पोलिसांकडून अद्याप सुरु आहे. लवकरच आरोपीला पकडण्यात येईल त्यानंतरच या गुन्ह्याची संपर्ण माहिती देणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून देण्यात आली. मात्र सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मृतदेह आढळून आलेली मृतक तरुणी भिवंडी परिसरात राहणारी असल्याचे समोर आले आहे.