ठाणे - कल्याण रेल्वे स्थानक परिसरात व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी स्थानिक भाजपच्या माजी नगरसेवकाने एका व्यवसायिकाला 5 लाख खंडणीची मागणी होती. मात्र व्यवसायीकांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने भाजपच्या माजी नगरसेवकाने पाच साथीदारांच्या मदतीने एकाच्या पोटात चॉपर भोसकल्याची घटना घडली होती. घटनेच्या दिवसापासून फरार असलेला माजी नगरसेवकाला महात्मा फुले चौक पोलीसांनी 10 दिवसांनी साथीदारासह अटक केली आहे. सचिन खेमा असे माजी नगरसेवकाच नाव आहे.
यापुढे तू कसा जगतो, अशी दिली धमकी -
मुख्य आरोपी सचिन खेमा हा कल्याण पश्चिमेच्या मार्केट परिसरातील भाजपाचा माजी नगरसेवक आहे. त्याचा मुरबाड रोडला मुरार बागेतील मोरे चाळीत राहणारा व्यापारी अमजद सय्यद (31) याच्याशी गेल्या काही दिवसापासून वाद सुरु होता. त्यातच अमजद सय्यद याचा मित्र भूषण जाधव याने याच पोलिस ठाण्यात माजी नगरसेवक सचिन खेमा याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी, तसेच अमजद सय्यद याचा कल्याण रेल्वे परिसरात असलेला छत्री व पतंगाचा धंदा या पुढे चालू ठेवण्याकरिता सचिन खेमा याला 5 लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर यापुढे तू कसा जगतो, अशी धमकी दिली व्यवसायिकाला दिली होती.
5 जानेवारीला पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली घटना..
दरम्यान व्यवसायिकाने खंडणी देण्यास नकार दिला. यामुळे संतपलेल्या नगरसेवकाच्या टोळीतील नितीन खेमा, प्रेम चौधरी, सतेज पोकळ उर्फ बाळा, बबलू शेख, आणि अन्य एक अनोळखी इसम अशी 6 जणांनी मिळून 5 जानेवारीला बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास कल्याण पश्चिम भागातील सुभाष चौकातील फुटपाथवर अमजद सय्यद याला गाठले. त्याच्या समवेत त्याचा मित्र चेतन शेट्टी आणि शहाबाज मुलानी असे दोघे होते. धमकी दिल्यानंतर ते दोघ मित्र पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला निघाले असता हे पाहून नगरसेवक सचिन खेमा याच्या चिथावणीवरून त्याच्या साथिदारांनी कट-कारस्थान रचले आणि अमजदच्या पोटात चॉपर खुपसला. तसेच प्रेम चौधरी यानेही हातावर चॉपरने वार करून अमजदला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
दोन दिवसांची पोलीस कोठडी -
अमजदला वाचवण्यासाठी मधे पडलेला त्याचा मित्र शहाबाज मुलानी याच्या हातावरही सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात अमजद आणि त्याचा मित्र शाहबाज असे दोघे गंभीर जखमी झाले. हे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. त्यानंतर जखमी अमजद व शहाबाज यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. दरम्यान आज सुट्टीच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीना हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खंडणी प्रकरणी व्यापाऱ्यावर चॉपरने हल्ला करणाऱ्या भाजपाच्या माजी नगरसेवकाला अटक - भाजपा नगरसेवकाचा व्यापाऱ्यावर चॉपरने हल्ला
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी स्थानिक भाजपच्या माजी नगरसेवकाने एका व्यवसायिकाला 5 लाख खंडणीची मागणी होती. मात्र व्यवसायीकांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने भाजपच्या माजी नगरसेवकाने पाच साथीदारांच्या मदतीने एकाच्या पोटात चॉपर भोसकल्याची घटना घडली होती.महात्मा फुले चौक पोलिसांनी घटनेच्या 10 दिवसांनंतर साथीदारांसह मुख्य आरोपीला अटक केली आहे. सचिन खेमा असे माजी नगरसेवकाच नाव आहे. आज सुट्टीच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीना हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.