ठाणे : जंगलातील वणवा गावापर्यंत पसरल्याने आगीत अनेक जनावरे होऊन होरपळून जखमी झाली आहेत. यापैकी एका जनावराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आगीच्या कचाट्यात सापडल्याने शेतकरीही जखमी झालेत त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मुरबाड तालुक्यातील मासले बेलपाडा हद्दीतील संतवाडी शेजारी असलेल्या जंगलात घडली आहे.
गोठ्यात बांधलेली ३ जनावरे गंभीर १ जनावराचा मृत्यू...
मुरबाड तालुक्यातील मासे बेलपाडा हद्दीतील संतवाडी शेजारी दाट जंगल आहे. या जंगलात दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग बघता बघता बेलपाडा हद्दीतील काही घराजवळ येऊन पोचली होती. यावेळी ही आग पसरून शेतकऱ्यांच्या गोठ्याला लागली. त्यात गोठ्यात बांधलेली तीन जनावरे गंभीर भाजली असून एक जनावराचा मृत्यू झाला आहे. जनावरांना वाचवताना यशोदा सोमने ही महिला गंभीर जखमी झाली आहे.
आगीत शेतकऱ्यांचा लाखोंचा पेंढा जळून खाक..
मासले बैल पोळा गावातील शेतकरी नारायण कुरले, एकनाथ रघुनाथ सोमने, विश्वास तुकाराम सोमने, संतोष मारुती हरड, शेखर महादू सोमने, रघुनाथ हळू डोहाळे, विजय रामू खुटले, काथोड दाजी म्हाडसे या शेतकऱ्यांचा पेंढा जळून खाक झाला आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन वनअधिकार्याला सूचना देत, शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात आधीच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - भातसा नदीत दोन युवक बुडाले; शोध सुरू
हेही वाचा - दक्षिण आफ्रिकेतून औषध आणून देण्याच्या नावाखाली रुग्णाला दिली पिठी साखर