ठाणे (मिरारोड): मिरारोड स्थानकावरून रिक्षामधून जाणाऱ्या दोन परदेशी महिला आपली बॅग विसरल्या. त्यामध्ये भारतीय रक्कमेनुसार दोन लाख रुपयांच्या नोटा होत्या. मिरारोड पोलिसांनी चोवीस तासात आरोपीचा शोध घेऊन त्या परदेशी महिलेला बॅग मिळवून दिली आहे.
मुलीच्या उपचारासाठी आली होती महिला: मिरारोड पूर्वेच्या भक्ती वेदांत रुग्णालयात न्यूरॉलॉजिस्टकडे उपचारासाठी दक्षिण आफ्रिकेमधील कंझानिया देशातून एक महिला आपल्या मुलीला घेऊन आली होती. गुरुवारी कामानिमित्त बांद्रा वरून मिरारोड परतली आणि मिरारोड स्थानका बाहेरून रिक्षा पडकून हॉटेलमध्ये जात होती. त्यावेळी ती महिला रिक्षामध्ये बॅग विसरली आणि त्यामध्ये २४ अमेरिकन डॉलर होते. भारतीय चलनानुसार त्याचे मूल्य दोन लाख रुपयांपेक्षा अधिक होते. ज्या हॉटेलमध्ये महिला थांबली होती त्यांना ही माहिती देताच हॉटेल चालकासह दोन्ही महिला गुरुवारी रात्रभर रिक्षा चालकाचा शोध घेत होते.
पोलिसांच्या तपासाला यश: शुक्रवारी हॉटेल चालकाने मिरारोड पोलिसांना घटनेची माहिती दिली. संबंधित महिलेची माहिती घेऊन पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी पोलीस हवालदार विलास गायकवाड यांना तपासाचे सूत्र दिले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व तांत्रिक दृष्ट्या तपास करून चोवीस तासात संबंधित रिक्षा चालकास विरार मधून ताब्यात घेतले. चौकशीमध्ये संबंधित रिक्षा चालकाकडे परदेशी महिलेची बॅग आढळून आली. या बॅगेमध्ये असलेल्या परदेशी चलनासह इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी संबंधित महिला नसरा मुल्हेड यांना बॅग सुपूर्द करण्यात आली. यावेळी या दोन्ही परदेशी महिलांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.
पोलिसांचे यापूर्वीही कौतुकास्पद कार्य: अडचणीत अडकलेल्या नागरिकांना पोलीस दल नेहमीच मदत करत असते. असाच एक प्रत्यय मुंबईत आला होता. मागील वर्षी एक विदेशी अभियंत्याची लॅपटॉपची बॅग रेल्वे प्रवासात चोरीला गेली होती. त्याने मुंबई पोलिसांकडे याविषयी तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन 24 तासाच्या आत चोराला हुडकून काढले आणि अभियंत्याचे लॅपटॉप त्याला परत केले होते. यामुळे पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली होती.
हेही वाचा: