ठाणे : ठाणेमधील या विकृत घटनेने, या पीडित पत्नी २९ वर्षीय असून, तिचा भिवंडी शहरातील पिराणी पाडा भागातल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सैफ हुसेन काजी याच्यासोबत तिचा निकाह झाला होता. मात्र, निकाह झाल्यापासून काही दिवसांतच पीडित पत्नीचा छळ सासरच्या मंडळीकडून सुरू होता. त्यातच २७ नोव्हेंबर २०२२ ते ९ जानेवारी २०२३ पर्यंत तिन्ही आरोपींनी संगनमत करून पीडितेकडे हुंड्यासाठी तगादा लावला होता. त्यानंतर पती, सासरे आणि नणंदच्या नेहमीच्या छळाला कंटाळून पीडित पत्नी माहेरी निघून गेली होती.
पीडिता माहेरी राहण्यास गेल्यावरदेखील सासरच्या लोकांचा त्रास : पीडिता माहेरी राहण्यास गेल्यावरदेखील विकृत पती व सासरे आणि नणंद त्रास देत असल्याचे पाहून अखेर विकृत पती सैफ हुसेन काजी, (वय २७) सासरे परवेज हुसेन काजी (वय ५२) व नणंद आशया काजी (वय २५) या तिघांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७७, ३२३, ५०४, ५०६, ४९८ (अ ), ३४ प्रमाणे ७ फ्रेब्रुवारी रोजी गुन्हा केला. दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण विकृत पतीसह सासरे आणि नणंदला लागताच तिघेही फरार झाले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे करीत आहेत.
संतापलेल्या पतीने पत्नीला पिस्तूलचा धाक दाखवून : पहाटे २ वाजता भिवंडीतील माधवनगरमधील गायवाली चाळीत घडली असून या घटनेत तर २८ वर्षीय पत्नीकडेच तिच्या १९ वर्षीय बहिणीशी ५२ वर्षीय पतीने निकाह करण्याची मागणी केली होती. मात्र पत्नीने लहान बहिणीसोबत निकाहा करण्यास पतीला नकार देताच, संतापलेल्या पतीने पत्नीला पिस्तूलचा धाक दाखवून तिच्या डोक्यात लोखंडी तवा मारून गंभीर जखमी केले तर आईला वाचविण्यासाठी आलेल्या दीड वर्षाच्या लेकीलाही डोक्यात लाटण्याने मारहाण करून जखमी केले आहे.
विविध कलमांनुसार पतीसह कुटुंबावर गुन्हा दाखल : याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात पीडित पत्नीच्या तक्रारीवरून पती नासिर खान (५२) याच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी पतीला ७ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास अटक केली आहे. तसेच, सर्व कुटुंबीयांवरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. सासरे आणि नणंदवर असलेले गंभीर आरोपांमुळे त्यांना पोलिसांनी त्यांना चौकशीकरिता बोलावले होते. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे करीत आहेत.