ETV Bharat / state

टेंपोच्या धडकेत पाच वर्षीय बालिका ठार; तर दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्यासह तिघेजण गंभीर - thane

मृत मुलीला तिच्या आईने घरगुती सामान आणण्यासाठी दुकानावर पाठवले होते. त्यावेळी ती रस्त्याने पायी जात असताना टेंपोची धडक बसून तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

टेंपोच्या धडकेत पाच वर्षीय बालिका ठार
author img

By

Published : Apr 22, 2019, 8:09 AM IST

ठाणे - भिवंडीत दोन वेगवेगळ्या अपघातात एका ५ वर्षीय बालिकेचा टेंपोच्या धडकेत जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत भरधाव दुचाकीची धडक पादचाऱ्याला बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वरासह तिघेजण गंभीर जखमी झाले. या दोन्ही अपघाताची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

टेंपोच्या धडकेत पाच वर्षीय बालिका ठार

पहिल्या अपघातात भरधाव टेंपोची धडक बसून अपघात झाल्याने या अपघातात ५ वर्षीय बालिका जागीच ठार झाल्याची घटना दुपारी प्रेरणा कॉम्प्लेक्स, वळपाडा येथे घडली. शिवांगी दिनेशकुमार सरोज (५ वर्ष ) असे अपघातात ठार झालेल्या बालिकेचे नांव आहे. मृत मुलीला तिच्या आईने घरगुती सामान आणण्यासाठी दुकानावर पाठवले होते. त्यावेळी ती रस्त्याने पायी जात असताना टेंपोची धडक बसून तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी टेंपो चालकास रविवारी अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत भरधाव दुचाकीची धडक पादचाऱ्याला बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांसह तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना काल्हेर येथे घडली आहे. मयूर बाबाजी उसीद (२१ रा. कशेळी) असे जखमी पादचाऱ्याचे तर अक्षय अंकुश बोदाडे (२० रा. काल्हेर) व नितीन बोदाडे (१७) असे दुचाकीवरील जखमींची नांवे आहेत. यातील जखमी पादचारी मयूर हा एकविरा हॉटेलसमोरून रस्ता ओलांडत असताना अक्षय बोदाडे याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मोटारसायकल भरधाव वेगात चालवून त्यास धडक दिली. या अपघातात तिघांनाही गंभीर दुखापती झाल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघात प्रकरणी अक्षय याच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेंपोच्या धडकेत पाच वर्षीय बालिका ठार तर दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्यासह तिघेजण गंभीर जखमी 

ठाणे :- भिवंडीत दोन वेगवेगळ्या अपघातात एका पाच वर्षीय बालिकेचा टेंपोच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत भरधाव दुचाकीच्या धडक पादचाऱ्याला बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वरासह तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही अपघाताची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पहिल्या घटनेत आईने दुकानावर सामान आणण्यासाठी पाठवल्याने  भरधाव  टेंपोची धडक बसून अपघात झाल्याने या अपघातात पाच वर्षीय बालिका जागीच ठार झाल्याची घटना दुपारी प्रेरणा कॉम्प्लेक्स,वळपाडा येथे घडली आहे. शिवांगी दिनेशकुमार सरोज ( ५ वर्ष ) असे अपघातात ठार झालेल्या बालिकेचे नांव आहे. मृतक मुलीला तिच्या आईने घरगुती सामान आणण्यासाठी दुकानावर पाठवली होती. त्यावेळी ती रस्त्याने पायी जात असताना टेंपोची धडक बसून तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी टेंपो चालकास रविवारी अटक करण्यात आली आहे.       

दुसऱ्या घटनेत भरधाव दुचाकीची धडक पादचाऱ्याला बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांसह तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना काल्हेर येथे घडली आहे. मयूर बाबाजी उसीद (२१ रा. कशेळी) असे जखमी पादचाऱ्याचे तर अक्षय अंकुश बोदाडे (२० रा. काल्हेर ) व नितीन बोदाडे ( १७ ) असे दुचाकीवरील जखमींची नांवे आहेत. यातील जखमी पादचारी मयूर हा एकविरा हॉटेलसमोरून रस्ता ओलांडत असताना अक्षय बोदाडे याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मोटर सायकल भरधाव वेगात चालवून त्यास धडक दिली. या अपघातात तिघांनाही गंभीर दुखापती झाल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघात प्रकरणी अक्षय याच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.