ETV Bharat / state

मैत्रिणीसोबत कारमधून जाणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला करून लुटणारे गजाआड

मैत्रिणीसोबत कारमधून जाणाऱ्या तरुणावर अचानक जीवघेणा हल्ला करून त्याच्या व मैत्रणीकडील मोबाईल व सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या चोरट्यांच्या कोनगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अब्दुल कादिर अबरार शेख, उमर अब्दुल रहेमान मन्सुरी, निहाल नजीर शेख, अशी अटक केलेल्या लुटारूंची नावे आहेत. त्यांच्याकडून मुद्देमाल घेणाऱ्या आकाश राजेश कंडारे व सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख यांना देखील अटक करण्यात आली आहे.

five arrested for robbery in thane district

author img

By

Published : Oct 20, 2021, 4:55 PM IST

ठाणे - मैत्रिणीसोबत कारमधून जाणाऱ्या तरुणावर अचानक जीवघेणा हल्ला करून त्याच्या व मैत्रणीकडील मोबाईल व सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी गजाआड केले आहे. अब्दुल कादिर अबरार शेख (वय 24 वर्षे, रा. मोईवाडा, कल्याण प.), उमर अब्दुल रहेमान मन्सुरी (वय 24 वर्षे, रा. गोविंदवाडी, कल्याण प.), निहाल नजीर शेख (वय 23 वर्षे, रा. गोविंदवाडी, कल्याण प.), अशी अटक केलेल्या लुटारूंची नावे आहेत. तर या चोरट्यांकडून चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. आकाश राजेश कंडारे (वय 24 वर्षे), सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख (वय 27 वर्षे), असे चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या अटक आरोपींचे नावे आहेत.

माहिती देताना पोलीस उपायुक्त

कार समोर दुचाकी आडवी लावून लुटमारी

ठाणे शहरातील पाचपाखाडी भागात राहणारे दर्शिल हितेश गुढका (वय 27 वर्षे) हा त्याच्या मैत्रिणीसोबत 12 आक्टोबरच्या मध्यरात्री चारचाकी वाहनाने पाईपलाईन रोडने डोगराळीकडून घरी ठाणे येथे जात होते. त्यावेळी अचानक रेल्वे पुलाखाली अनोळखी तिघांनी त्याच्या कार समोरच दुचाकी आडवी लावून उभी केली. विचारपूस करण्यासाठी दर्शिल कारमधून बाहेर पडताच तिघांनी त्याचा मोबाईल हिसकावला तसेच मैत्रीणकडीलही मोबाईल, तिच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील सोन्याची अंगठी, असा एकूण 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने काढून घेतला. त्यावेळी दर्शिलने चोरट्यासोबत प्रतिकार केला असता त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार करून मुद्देमाल घेऊन घटनस्थळावरून फरार झाले. तर चोरट्यांच्या हल्ल्यात दर्शिल याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मात्र, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातारवण निर्माण झाले.

तीन पोलीस पथकाने शोध घेऊन आरोपीसह मुद्देमाल केला हस्तगत

चोरट्यांनी गुन्हा करताना निर्जनस्थळ व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन केला होता. त्यामुळे पोलिसांकडे हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कुठलाही सुगावा नसल्याने पोलिसांसोर मोठे आव्हान होते. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पोलीस पथके नेमली होती. त्यांनतर पोलीस तपासात, खबऱ्याकडून मिळालेली माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यातील अब्दुल कादीर अबरार शेख, उमर अब्दुल रहेमान मन्सुरी, निहाल नजीर शेख यांना कल्याणमधून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता तिघांनीही गुन्हा केल्याचे कुबल केले. मात्र, लुटमारीतील मुद्देमाल इतर दोघांना विक्री केल्याने मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून आकाश राजेश कंडारे आणि सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख या दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून चोरीचा विकत घेतलेला मुद्देमाल जप्त केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे.

पाचही आरोपी सराईत गुन्हेगार

गुन्ह्याच्या प्रकरणी अटक केलेल्या पाचही आरोपींचा कोनगाव पोलिसांनी अधिक तपास केला असता, आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले. आरोपी अब्दुल कादिर अबरार शेख 3 गंभीर गुन्हे, उमर अब्दुल रहेमान मन्सुरी 3 गुन्हे , निहाल नजीर शेख 14 गुन्हे आणि चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या आकाशवर तब्बल 14 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. हा गुन्हा उघडकीस सहयक पोलीस निरीक्षक किरणकुमार वाघ आणि गुहे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक पराग भाट यांच्यासह पथकाने कामगीरी बजावली आहे.

हेही वाचा - धक्कादायक! नशेसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दगडाने ठेचून मामेभावाची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.