ETV Bharat / state

भिवंडीत अवैध रेती उत्खनन करणाऱ्या पाच जणांना अटक - भिवंडी अवैध रेती उत्खनन

तालुक्यातील दिवे-अंजूर या खाडीलगतच्या रस्त्यावरील मुंबई शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रेती माफिया अनधिकृतपणे रेती उत्खनन करीत असल्याची माहिती काल्हेर तलाठी योगेश पाटोळे यांना मिळाली.

ठाणे भिवंडी
ठाणे भिवंडी
author img

By

Published : Aug 9, 2020, 8:36 PM IST

ठाणे - भिवंडी तालुक्याच्या वायव्य पट्ट्यातून वाहणाऱ्या उल्हास खाडीतून रेती माफिया मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रेती उत्खनन करून पर्यावरणाचा ऱ्हास करीत असल्याच्या तक्रारी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, पोलीस व महसूल प्रशासन कोरोना संकटाचा सामना करण्याच्या कामात व्यग्र असल्याचा फायदा उठवित रेती माफिया सक्रिय झाले होते.

अखेर या तक्रारींची दखल महसूल विभागाने घेतली. तालुक्यातील दिवे-अंजूर या खाडीलगतच्या रस्त्यावरील मुंबई शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रेती माफिया अनधिकृतपणे रेती उत्खनन करीत असल्याची माहिती काल्हेर तलाठी योगेश पाटोळे यांना मिळाली. त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यास याबाबत कळवल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पोलीस पथकासह तलाठी योगेश पाटोळे घटनास्थळी दाखल झाले.

त्यावेळी रेती माफिया लोखंडी बार्जवरील सक्शन पंपद्वारे रेती उत्खनन करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी बार्जवरील हुसैन उर्फ साबीर अक्रम शेख, यासिन तैमुर शेख ,इब्राहिम उमर, नसरुद्दीन तैसर शेख, रॉयल शफिकउल शेख (सर्व रा.वेहळे ) या पाच रेती माफियांना ताब्यात घेऊन अटक केली व रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले. त्यांना 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तर या ठिकाणाहून तीन ते चार रेती माफिया रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन खाडी पात्रात उड्या मारून पळून जाण्यात यशस्वी झाले. या अवैध रेती उत्खननप्रकरणी तलाठी योगेश पाटोळे यांच्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी वरील अटक केलेल्या पाच जणांसह सुरज शेठ व अल्पेश शेठ या बार्ज मालकांसह पळून गेलेल्या तीन ते चार अज्ञात रेती माफियांविरोधात गुन्हा दाखल केला. 14 लाख रुपयांचे सात सक्शन पंप व 21 लाख रुपयांचे लोखंडी सात बार्ज असा एकूण 35 लाखांचा रेती उत्खननासाठी वापरात आणलेला मुद्देमाल जप्त केला आहे.

महसूल व पोलीस विभागाच्या या संयुक्त कारवाईने रेती माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या अवैध रेती उत्खनन गुन्ह्याचा अधिक तपास नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.