मुंबई - मध्य रेल्वेच्या पहिल्या एसी लोकलचा आज शुभारंभ झाला. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. यावेळी पहिली एसी लोकल चालवण्याचा मान महिला मोटारमनला देण्यात आला.
मध्य रेल्वेच्या इतिहासात ट्रान्स हार्बर मार्गावर आजपासून पहिली एसी लोकल पनवेलवरुन ठाण्याकडे धावली. विशेष म्हणजे लोकलच्या पहिल्या फेरीचे सारथ्य महिला मोटर वूमेन मनिषा म्हस्के यांनी केले. ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकलच्या नियमित फेर्या होणार असून दिवसाला 16 फेर्या होणार आहेत.
भविष्यात रेल्वेच्या सुविधेसाठी ५० कोटींचा निधी देणार असल्याचे वक्तव्य रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केले. तसेच जम्मू काश्मीरला जोडण्यासाठी सर्वात मोठा ब्रिज बांधण्याचे काम सुरू करणार आहे. राजकरण होत नसल्याने आम्ही रेल्वेला सुविधा देऊ शकलो असेही ते म्हणाले. लोकल स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही प्रवाशांची देखील आहे. परदेशात आम्ही सर्व नियमांचे पालन करतो मात्र, आपल्या इथे नियम मोडतो असेही सुरेश अंगडी म्हणाले.
ट्रान्स हार्बर मार्गावरून दोन्ही दिशेकडून एसी लोकलच्या एकूण १६ फेऱ्या होणार आहेत. मात्र, शनिवार, रविवारी एसी लोकल धावणार नाही. पनवेल ते ठाणे दरम्यान १८५ इतका तिकीट दर आहे. अशी माहिती रेल्वेचे वरीष्ठ जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी दिली.एसी लोकल धावेल या चर्चा होत होत्या मात्र, तांत्रिक कारणामुळे एसी लोकल चालविणे शक्य होत नव्हते. आज या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आणि अखेर एसी लोकल धावली. एसी लोकलची उंची कमी करून पहिली एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर धावली आहे. सोमवार ते शुक्रवार नियमित वेळेत ही एसी लोकल धावणार आहे,
लोकल सुटण्याची वेळ
पनवेल-ठाणे सकाळी ५.४४
ठाणे-नेरुळ सकाळी ६.४६
नेरुळ-ठाणे सकाळी ७.२९
ठाणे-वाशी सकाळी ०८.०८
वाशी-ठाणे सकाळी ८.४५
ठाणे-नेरुळ सकाळी ९.१९
नेरुळ-ठाणे सकाळी ९.५७
ठाणे-बेलापुर सकाळी १०.४०
पनवेल-ठाणे दुपारी ४.१४
ठाणे- नेरुळ सायंकाळी ५.१६
नेरुळ-ठाणे सायंकाळी ५.५४
ठाणे-नेरुळ सायंकाळी ६.२९
नेरुळ-ठाणे सायंकाळी ७.०८
ठाणे-पनवेल सायंकाळी ७.४९
पनवेल-ठाणे रात्री ८.५२
ठाणे-पनवेल रात्री ९.५४
स्थानक | किमी | तिकिट दर | मासिक पास |
ऐरोली | 6 | 70 | 755 |
रबाळे | 9 | 70 | 755 |
घणसोली | 11 | 95 | 1015 |
कोपरखैरणे | 13 | 95 | 1015 |
तुर्भे | 16 | 140 | 1455 |
जुईनगर | 18 | 140 | 1500 |
नेरुळ | 21 | 140 | 1510 |
सिवूड | 22 | 140 | 1510 |
बेलापूर | 24 | 140 | 1510 |
खारघर | 27 | 185 | 1940 |
मानसरोवर | 30 | 185 | 1975 |
खांडेश्वर | 32 | 185 | 1985 |
पनवेल | 35 | 185 | 1985 |