ठाणे - आज पहाटे पाच वाजता मुंब्रा खाडी येथे काही लोकांना एक महिला पाण्यात बुडत दिसली. यानंतर स्थानिक नागरिकांनी याची माहिती महापालिकेला दिली. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी या महिलेला वाचवले. या महिलेचे नाव ज्योती गुड्डू उपाध्याय असे असून, ती भिवंडीची रहिवासी आहे.
मुंब्रा पोलीस करत आहेत तपास
येथील नागरिकांनी लवकर आपत्ती व्यवस्थापन विभागाला संपर्क केल्याने या महिलेला वाचवण्यात या जवानांना यश आले. याबाबत नागरिकांचा हजरजबाबीपणा येथे चर्चेचा विषय ठरला आहे. घरगुती अत्याचाराला कंटाळून आपण हे पाऊल उचलल्याची माहिती या महिलेने मुंब्रा पोलिसांना दिली. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.