ETV Bharat / state

Thane Fire: गॅस गळतीमुळे घराला भीषण आग; माजी फोर्स वन कमांडो धाडसामुळे वाचले कुटुंबाचे प्राण

Thane Fire: घरगुती गॅस सिलेंडरमधून झालेल्या गळतीमुळे कल्याणात घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. विशेष म्हणजे माजी फोर्स वन कमांडोने दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे घरातील 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह 6 जणांचा जीव वाचू शकला.

Thane Fire
Thane Fire
author img

By

Published : Nov 30, 2022, 11:20 AM IST

ठाणे: घरगुती गॅस सिलेंडरमधून झालेल्या गळतीमुळे कल्याणात घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. विशेष म्हणजे माजी फोर्स वन कमांडोने दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे घरातील 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह 6 जणांचा जीव वाचू शकला. कल्याण पश्चिमेच्या आरटीओ परिसरात असलेल्या सर्वोदय हाईट इमारतीत ही घटना घडली. मात्र या भीषण आगीत संसार उपयोगी साहित्यांची राखरांगगोळी होऊन लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.

गॅस गळतीमुळे घराला भीषण आग

गॅस गळतीमुळे आग लागली: सर्वोदय हाईट या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कौर कुटंबीय राहतात. मंगळवारी त्यांच्या घरामध्ये संध्याकाळी सहा ते साडे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक गॅस गळतीमुळे आग लागली. त्याचवेळी या परिसरातून दिपक नाथा घरत हे सध्या मुंबई पोलीस दलात नेमणुकीला असणारे माजी फोर्स वन कमांडो आपल्या मुलाला घरी घेऊन चालले होते. त्यांच्या निदर्शनास ही आग लागल्याचे तसेच घरात काही लोकं अडकल्याचे दिसून आले. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या मुलाला गाडीवर बसवले आणि आग लागलेल्या घराकडे मदतीसाठी धाव घेतली. या इमारतीच्या रंगकामासाठी रस्त्यालगत बाहेरून बांबूची परांची बांधण्यात आली होती.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप: या परांचीवरूनच दिपक घरत हे सरसर वर चढून गेले आणि आग लागलेल्या घराच्या बाल्कनीतून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. घरत यांनी मदतीसाठी धाव घेताच परिसरातील आणखी काही धाडसी नागरिकांनीही मग त्यांचा मागोमाग परांचीवर चढून घरत यांना मदतीचा हात दिला. बाल्कनीतून बांबूंच्या परंचीद्वारे या सर्व कुटुंबीयांना घरत यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप खाली उतरवले. दरम्यान या घटनेत 6 महिन्यांच्या बाळाला काहीही इजा झाली नसली, तरी या कुटुंबातील दोन्ही महिला होरपळून जखमी झाल्या आहेत. तर दिपक घरत यांनादेखील या मदत कार्यादरम्यान काहीशी दुखापत झाली आहे.

6 महिन्यांच्या चिमुरड्याला वाचवल्याचा मोठा आनंद- दिपक घरत या आगीमध्ये कुटुंबातील सर्वांचे प्राण आपण वाचवू शकलो ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मात्र त्यातही या घटनेत 6 महिन्यांच्या त्या बाळाला वाचवल्याचा आनंद अधिक असल्याची प्रतिक्रिया दिपक घरत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. तसेच आपण सध्या मुंबई पोलीस दलात काम करत असून यापूर्वी फोर्स वन कमांडो म्हणून काम केले आहे. त्यामुळे कमांडो ट्रेनिंग घेतले असल्याने त्याचा आपल्याला या घटनेत मोठा फायदा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.