ETV Bharat / state

Fire Broke Out in Warehouse : भिवंडीत कागदी रोलच्या गोदामाला भीषण आग

author img

By

Published : Mar 5, 2022, 6:47 PM IST

पुठ्याचे बॉक्स बनविण्यासाठी लागणाऱ्या कागदी रोलची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग ( Fire Broke Out in Warehouse ) लागल्याची घटना भिवंडी ( Bhiwandi ) तालुक्यातील मानकोली रोडवरील वळपाडा हद्दीत असलेल्या दादोबा कंपाउंड येथे घडली आहे. या आगीत कागदी रोलचा साठा मोठ्या प्रमाणात जाळून खाक झाला आहे.

छायाचित्र
छायाचित्र

ठाणे - पुठ्याचे बॉक्स बनविण्यासाठी लागणाऱ्या कागदी रोलची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग ( Fire Broke Out in Warehouse ) लागल्याची घटना भिवंडी तालुक्यातील मानकोली रोडवरील वळपाडा हद्दीत असलेल्या दादोबा कंपाउंड येथे घडली आहे. या आगीत कागदी रोलचा साठा मोठ्या प्रमाणात जाळून खाक झाला आहे.

वळपाडा हद्दीत असलेल्या दादोबा कंपाउंड येथे कागदी रोलचा साठा करणारे गोदाम आहे. या गोदामात शनिवारी ( दि. 5 मार्च ) दुपारच्या सुमारास आग लागली. त्यानंतर अग्निशमन दल ( Fire brigade ) घटनास्थळी पोहोचले. या कागदी रोलवर पाण्याचा फवारा मारल्या नंतरही केमिकलमुळे रोल पुन्हा पेट घेत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलास मोठे प्रयत्न करावे लागले. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसून या आगीची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर दोन ते तीन तासात नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मार्च महिना उजाडला की भिवंडीत गोदाम, कारखान्यांना आगी लागण्याचे सत्र सुरू होत असते. त्यामुळे या आगीच्या घटनांमध्ये संशयाचा धूर नेहमीच पसरत असतो.

हेही वाचा - Thane Crime News : प्रेमाच्या त्रिकोणातून कल्याणमध्ये थरार; कारचालकाने तरुणाला फरफटत नेले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.