ETV Bharat / state

Thane News : डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी ; कबाडकष्ट करून बांधलेल्या घराला भीषण आग, आगीत दोन जण जखमी

मुरबाड तालुक्यातील डेहनोली गावात झिपा घोरड यांच्या घराला अचानक आग लागली. आगीत कुटूंबातील दोघे आगीत होरपळून जखमी झाले. सर्व धान्य कपडे व किंमती वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून संसाराची राखरांगोळी झाली.

author img

By

Published : Jan 22, 2023, 2:26 PM IST

Updated : Jan 23, 2023, 7:23 AM IST

Thane News
घराला भीषण आग
प्रतिक्रिया देताना मधुकर झिपा घोरड

ठाणे : पत्नीने कबाडकष्ट करून बांधलेल्या घराला भीषण आग लागून डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मुरबाड तालुक्यातील डेहनोली गावातील झिपा घोरड यांच्या घरात घडली असून या आगीत लाखोंचे नुकसान झाले. तर आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरू नये म्हणून गावकऱ्यांनी धाव घेऊन आगीवर पाण्याचा मारा करून सतर्कता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

घराला अचानक आग : मुरबाड तालुक्यातील डेहनोली गावात झिपा घोरड हे कुटुंबासह राहतात. शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली. त्यावेळी घोरड यांचे कुटुंबीय गाढ झोपेत होते. पहाटे दोनच्या सुमारास गावातील नागरिकांनी घोरड यांच्या घराकडे धाव घेऊन घरातील कुटूंबाला जोराजोरात आरडाओरड करत केली. मधुकर घोरड यांनी आवाज ऐकून घराचा दरवाजा उघडला असताना, आपलेच घर जळत असल्याचे समजले. त्यावेळी आगीचा उडालेला भडका पाहता घरातील सर्व धान्य कपडे व किंमती वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. या आगीतून कुटूंब बचावले आहे.

दुर्घटना टळली : तर घरातील कुटूंबाला बाहेर काढून भडकलेली आग इतरत्र पसरू नये, यासाठी गावकऱ्यांनी सतर्कता दाखवत मुरबाड नगरपंचायतचे अग्नीशमन दलाला पाचारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे संपूर्ण गावावरील दुर्घटना टळली. मात्र या आगीत झिपा घोरड यांच्या वयोवृद्ध पत्नीने काबाडकष्ट करून बांधलेले घर हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून संसाराची राखरांगोळी झाली.

होरपळून जखमी : घर संपूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने या कुटुंब ऐन थंडीच्या दिवसात उघड्यावर आल्याने त्यांनी या घटनेचा धसका घेतला. त्यांच्या पत्नीला धक्का बसून त्या बेशुद्ध अवस्थेत घराबाहेर पडून होत्या, तर घराची ही आग विझवताना, सतिश घोरड, मधुकर झिपा घोरड हे देखील होरपळून जखमी झाले असून त्यांच्यावर मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.

आग शॉट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज : ही भीषण आग शॉट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त केला जात आहे. तर आज सकाळच्या सुमारास या पिडीत कुटुंबाला सरपंच जिजाबाई घोरड यांनी तातडीने जीवनावश्यक वस्तु दिल्या असून आता शासन या कुटूंबाला काय मदत करणार ? याकडे पंचक्रोशीतील गावकऱ्याचे लक्ष लागले आहे. या आगीच्या घटनेची नोंद मुरबाड पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

हेही वाचा : Gas Cylinder Leaking : गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे घराला आग , ६ महिन्यांची चिमुरडी जिवंत जळाली

Last Updated : Jan 23, 2023, 7:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.