ठाणे - शीळ डायघर परिरसातील गौैसिया कंपाऊंडमध्ये भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीत ३० ते ३५ गोडाऊनसह घटनास्थळी असणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाड्याही जळून खाक झाले आहेत. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
शीळ डायघर परिसरातील डौसिया कंपाऊंडमध्ये भंगाराची अनेक गोडाऊन आहेत. या गोडाऊनमध्ये अचानक आग लागली. या आगीत तब्बल ३० हून अधिक गोडाऊन जळाले असल्याचे समजते. तसेच या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी ही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. अग्निशामक दलासह आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. अग्निशामक दलाच्या ३ गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.