नवी मुंबई - तुर्भे एमआयडीसीमधील बालाजी पॉलिकोट्स या कंपनीला काल भीषण आग लागली. या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा - मुरबाड तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीट; अनेक घरांचे नुकसान
आगीमध्ये बालाजी पॉलिकोट्स या कंपनीतील कलरसाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकलचा ड्रम फुटला. या ड्रमने पेट घेतल्यानंतर पेट घेऊन इतर ड्रमही फुटत होते. काही वेळातच ही आग बालाजी कंपनीच्या मागच्या बाजूलादेखील पसरली.
आगीची माहिती मिळताच एमआयडीसी आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. रविवार असल्याने या कंपनीत फारसे कामगार नव्हते, मात्र या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा - 'लसीकरणाचा वेग वाढवा, रुग्णांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज'; डॉक्टरांच्या एकनाथ शिंदेंना सूचना