ETV Bharat / state

FIR against Jitendra Awhad : सिंधी समाजाविरोधातील विधान भोवले; जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा

सिंधी समाजाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात हिल लाइन पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 153A, 153B, 295A आणि 298 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author img

By

Published : Jun 1, 2023, 5:51 PM IST

Updated : Jun 1, 2023, 8:49 PM IST

FIR against Jitendra Awhad
FIR against Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात हिल लाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी समाजाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी जितेंद्र आवाड यांच्याविरोधात ठाण्यातील हिल लाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आमदार आव्हाड यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीचे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष जमनादास खूबचंद पुरूरवाणी (वय ५७) यांच्या तक्रारी वरून हिल लाईन पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम १५३ए, १५३बी, २९५ए आणि २९८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Maharashtra | FIR registered against NCP leader Jitendra Awhad at Hill Line Police Station for his remarks against Sindhi community. Sections 153A, 153B, 295 A and 298 of the IPC invoked in the FIR: Thane Police

    (File photo) pic.twitter.com/nsFKtd1o3x

    — ANI (@ANI) June 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नेमकं काय झालं? : उल्हासनगर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. या विधानावर सिंधी समाजाने आक्षेप नोंदवला होता. तसेच ठाण्यातील सिंधी समाजाने कोपरी येथे एकत्र येऊन याचा निषेध नोंदवला. जोपर्यंत समाज माफी मागत नाही तोपर्यंत विविध संवैधानिक मार्गाने आंदोलन केले जाईल, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती.

सिंधी समाजाला कुत्र्यांची उपमा दिल्याचा आरोप : 27 मे रोजी उल्हासनगर प्रभात गार्डन कॅम्प-5 जवळ राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांची जीभ घसरली होती. यावेळी बोलताना आव्हाड यांच्यावर सिंधी समाजाला कुत्र्यांची उपमा दिल्याचा आरोप होता. आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर सिंधी समाज आक्रमक झाला होता. त्याविरोधात कोपरीतील सिंधी समाजाने एकत्र येऊन जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.

संवैधानिक मार्गाने निषेध : ठाण्यातील कोपरी परिसरात मोठ्या प्रमाणात सिंधी लोक राहतात. येथील सिंधी बांधवांनी कोपरी येथील शंकर मंदिरात एकत्र येऊन जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला होता. तसेच जितेंद्र आव्हाड माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना निवेदने देऊन संवैधानिक मार्गाने निषेध नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हेही वाचा - charge sheet against Awhad : डॉ. जितेंद्र आव्हाडाच्या अडचणीत वाढ, ठाणे पोलिसांकडून 500 पानाची चार्जशीट दाखल

Last Updated : Jun 1, 2023, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.