ETV Bharat / state

मांगूर जातीच्या माशांचे उत्पादन, विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मांगूर मासा मानवी प्रकृतीसाठी घातक ठरल्याने राष्ट्रीय हरित लवादाने या माशांच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे.

ganeshpuri police
गणेशपुरी पोलीस
author img

By

Published : Feb 8, 2020, 8:11 PM IST

ठाणे - मांगूर मासा मानवी प्रकृतीसाठी घातक ठरल्याने राष्ट्रीय हरित लवादाने या माशांच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, बंदी असतानाही भिवंडी तालुक्यातील 'साईगाव आसनोली येथील आदेश भोईर हा बेकायदेशीर मांगूर माशाचे उत्पादन व विक्री करत होता. त्यामुळे त्याच्याविरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बेकायदेशीर मत्स्यसाठा नष्ट करण्यात आला आहे.

हेही वाचा - २०० वर्ष जुन्या तोफांचे होणार विसर्जन घाटावर सुशोभीकरण

मांगूरचे उत्पादन घेताना माशांना कोंबड्यांचे, कत्तलखान्यात कुजलेली शेळी, मेंढी, म्हशी इत्यादींचे मांस खाद्य म्हणून वापरले जाते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते व हा मासा मानवी प्रकृतीसाठी घातक आहे. यावर राष्ट्रीय हरित लवाद यांनी 22 जानेवारी 2019 च्या निर्णयाद्वारे शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यात मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी मांगूर मत्स्य उत्पादक व मत्स्य वाहतूक करणारे यांच्यावर कारवाई तसेच मागूर माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार ठाणे जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांच्या आदेशानुसार प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांच्या मार्गदर्शनानुसार भिवंडी तालुक्यातील साईगाव आसनोली येथील आदेश भोईर याच्यावर गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बेकायदेशीर मांगूर मत्स्यसाठा नष्ट करण्यात आला आहे.

Intro:kit 319Body:भिवंडीत मांगूर जातीच्या माश्यांच्या उत्पादन व विक्री केल्याप्रकरणी गुन्हा

ठाणे : मांगुर मासा मानवी प्रकृती घातक ठरल्याने राष्ट्रीय हरित लवादाने या माश्यांच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र बंदी असतानाही भिवंडी तालुक्यातील 'साईगाव आसनोली येथील आदेश भोईर हा बेकायदेशीर मांगुर माशाच्या उत्पादन व विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने त्याच्याविरोधात गणेशपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून बेकायदेशीर मत्स्यसाठा नष्ट करण्यात आला आहे.
मांगुरचे उत्पादन घेतांना माशांना कोंबड्यांचे, कत्तलखान्यात कुजलेले शेळी-, मेंढी, म्हशी इत्यादींचे मास खाद्य म्हणून वापरले जाते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते व हा मासा मानवी प्रकृती घातक आहे. यावर राष्ट्रीय हरित लवाद यांनी 22 जानेवारी 2019 च्या निर्णयाद्वारे शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यात मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी मागूर मत्स्य उत्पादक व मत्स्य वाहतूक करणारे यांच्यावर कारवाई तसेच मागुर माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिले आहे.
त्यानुसार ठाणे जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय आयुक्त राजिव जाधव यांच्या आदेशानुसार प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांच्या मार्गदर्शनानुसार भिवंडी तालुक्यातील 'साईगाव आसनोली येथील आदेश भोईर याच्यावर गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बेकायदेशीर मांगुर मत्स्यसाठा नष्ट करण्यात आला आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.