ठाणे : चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून मिरारोड येथून दोन तरुणींना महिला वेश्यादलालसह तिच्या साथीदाराने संगनमताने आणून भिवंडीतील कुंटणखान्यात डांबून त्यांना बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याची घटना पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कशेळी गावातील एका हॉटेल समोर घडली आहे.
महिला दलालास अटक : याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून महिला दलालास अटक केली आहे. तर तिचा साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रुबिना उर्फ रीना आसिम शेख असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर साथीदार मुकुंद असे फरार झालेल्या वेश्या दलाल नाव आहे.
नोकरीचे दाखवले आमिष : घोडबंदर परिसरात अटक रुबिना राहते. काही दिवसापूर्वी तिचा फरार साथीदार मुकूंद या दोघांनी संगनमत करून मिरारोड भागात राहणाऱ्या दोन पीडित तरुणीनी ओळख झाली. त्या ओळखीतून पीडित तरुणींना नोकरीची गरज असलेल्याचे त्या पीडित तरुणींनी आरोपी दलालाना सांगितले. त्यानंतर दोन्ही तरुणींना चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांना भिवंडीत आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. सदरच्या घटनेची खबर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी रचला सापळा : त्या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कशेळी गावातील आईबाबा फॅमिली हॉटेलसमोर सोमवारी १३ मार्च रोजी दुपारी सापळा रचला होता. त्यावेळी महिला दलालाशी बनावट ग्राहकाने संर्पक करून हॉटेल समोर पीडित तरुणीशी आरोपी दलाला भेटण्यास बोलवले होते. त्याच सुमाराला सापळा लावून बसलेल्या पोलीस पथकाने नारपोली पोलिसांच्या मदतीने अचानक दलालांवर झडप घालून ताब्यात घेतले. तर त्यांच्या तावडीतून दोन्ही पीडित तरुणीची सुटका केली.
पोलिसांनी केली कारवाई : नारपोली पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाचे सहा, पोलीस उपनिरीक्षक निलेश दीनानाथ क्षीरसागर (वय ५३) यांच्या तक्रारीवरून भादवी कलम ३७० (२) , ३७० (३) सह ३४ तसेच अनैतिक मानवी प्रतिबंधक कायदा अधिनियम १९५९ चे कलम ४ आणि ५ प्रमाणे गुन्हा दाखल करून महिला दलाल रुबिनाला बेड्या ठोकल्या, मात्र तिचा साथींदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर पीडित दोन्ही तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास नारपोली पोलीस ठाण्याचे सपोनि प्रशांत आवारे करीत आहे.
हेही वाचा : 56 Blades In Stomach: भयंकर! तरुणाच्या पोटातून डॉक्टरांनी काढले 56 ब्लेड