ETV Bharat / state

नराधम सावत्र बापाच्या कृत्याने मुंब्रा हादरले; सहा वर्षीय मुलीवर करत होता पाशवी बलात्कार - बापाचा मुलीवर बलात्कार मुंब्रा ठाणे

भाड्याच्या घरात मोईज बुटवाला हा 44 वर्षीय नराधम आपली पत्नी आणि सहा वर्षीय सावत्र मुलीसोबत राहत होता. मुलीची आई कामानिमित्त बाहेर जाताच मोईज हा पीडित मुलीला अमानुष मारहाण करून तिच्यावर पाशवी बलात्कार करत असे. पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत असल्याने आपल्यासोबत जवळपास सहा महिने होत असलेले अमानुष कृत्य तिने कोणालाच सांगितले नाही.

ठाणे
ठाणे
author img

By

Published : Dec 5, 2020, 5:00 PM IST

ठाणे - माणुसकीला आणि दातृत्वाला काळिमा फासणारे कृत्य मुंब्रा येथे घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंब्र्यातील रशीद कंपाऊंड येथील चर्नी पाडा परिसरात बापच मुलीवर कित्येक महिने बलात्कार करत असल्याचे उघडकीस आले असून धक्कादायक म्हणजे हा नराधम मुलीच्या गुप्तांगावर मेणबत्तीने चटके देऊन बलात्कार करत होता.

भाड्याच्या घरात मोईज बुटवाला हा 44 वर्षीय नराधम आपली पत्नी आणि सहा वर्षीय सावत्र मुलीसोबत राहत होता. मुलीची आई कामानिमित्त बाहेर जाताच मोईज हा पीडित मुलीला अमानुष मारहाण करून तिच्यावर पाशवी बलात्कार करत असे. पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत असल्याने आपल्यासोबत जवळपास सहा महिने होत असलेले अमानुष कृत्य तिने कोणालाच सांगितले नाही. परंतु, या प्रकाराची माहिती परिसरातील स्त्रियांना कळताच त्यांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची समजूत काढली व घडत असलेला प्रकार विचारला. काही वेळाने धीर आल्याने सदर लहानगीने आपला सावत्र बाप आपले कसे शोषण करत होता याचा पाढाच वाचला.

मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली

पीडित मुलीची व्यथा ऐकून परिसरातील महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पीडितेची तपासणी करून तिच्यावरील अत्याचाराची खात्री पटताच मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली. कौसा पोलिसांनी नराधम सावत्र पित्याला अटक केली व भा.दं.वि. कलम 376, 323, 506 (2), बाल न्याय अधिनियम कलम 75, पॉस्को 4, 6, 8, 10, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. पोलीस उप निरीक्षक दिपक घुगे या प्रकरणी तपास करत आहेत.

नागरिक उतरणार रस्त्यावर

अशाप्रकारचे गंभीर गुन्हे ठाण्यातील मुंब्रा भागात होत असून यावर कठोर कारवाई करून हे गुन्हे करणाऱ्यांना जबर शिक्षा देणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत असून कठोर शासन होण्यासाठी आवश्यकता पडल्यास रस्त्यावर उतरण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.