ETV Bharat / state

Farmers Dindi : उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी जळगाव जिल्ह्यातून निघालेली शेतकऱ्यांची पायी दिंडी मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात - शेतकऱ्यांची पायी दिंडी

तब्बल चार हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन आणि चाळीस ग्रामपंचायतींच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन जळगाव जिल्हातील बोदवड येथील भोले महाकाल फाउंडेशनचे सदस्यांसह २२ शेतकरी पायी दिंडी (Farmers Dindi from Jalgaon district) काढत मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहे. आज ही पायी दिंडी नाशिक - कसारा घाट मार्गे मुख्यमंत्र्याच्या जिल्हात पोहचली आहे. विशेष म्हणजे दीर्घकाळापासून रखडलेल्या उपसा सिंचन योजनेला (Upsa Chanchan Yojana) पुरेसा निधी द्यावा, योजना पूर्ण करावी या मागणीसाठी ही पायी दिंडी मंत्रालयात धडकणार आहे. (Farmers Dindi )

Farmers Dindi
शेतकऱ्यांची पायी दिंडी
author img

By

Published : Jan 10, 2023, 10:57 PM IST

ठाणे : जळगाव जिल्ह्यातील बोदवड परिसर सिंचन (Upsa Chanchan Yojana) योजनेच्या कामाला गती मिळाल्यास जळगाव आणि बुलढाणा जिल्हातील पाच तालुक्यात असलेल्या १०१ महसुली गावपाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला लाभ होणार आहे. विशेषतः बोदवड, मुक्ताईनगर, मलकापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांची शेतीरूपी पंढरी सिंचनाखाली यावी यासाठी बोदवड मधील भोले महाकाल मल्टीपर्पज फाऊंडेशनचे सदस्य व २२ शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याकरीता पायी दिंडी (Farmers Dindi from Jalgaon district) १ जानेवारी पासून थेट मंत्रालयात निघाली आहे. या पायी दिंडीतील शेतकरी आज ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात दाखल झाले आहे. (Farmers Dindi )

४७४ किलोमीटरचा प्रवास : विशेष म्हणजे बोदवड तालुक्यातील तरुणांनी आपल्या शेतीला पाणी मिळावे व हे पाणी मिळण्याचे स्वप्न असलेली बोदवड परिसर उपसा सिंचन योजना पूर्ण करावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडण्याचा निर्धार केला आहे. यासाठी ते बोदवडहून पायी चालत मुंबई गाठणार आहेत. शेतकऱ्याची पायी दिंडी १ जानेवारी रोजीपासून जामनेर, पहूर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, विंचूर, निफाड, नाशिक, इगतपुरी, खर्डी, शहापूर, भिवंडी, ठाणे, बांद्रा ते थेट मुंबई मंत्रालय असा तेरा दिवसांत ४७४ किलोमीटरचा प्रवास ही पायी दिंडी करणार आहे.

उपसा सिंचन योजनेसाठी दिंडी : सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणांचा या दिंडीत सहभाग आहे. या सर्वांनी स्वयंपाकाचे सर्व साहित्य सोबत घेऊनच मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला निघाले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील बोदवड, जामनेर व मुक्ताईनगर आणि विदर्भातील बुलढाणा जिल्हातील मलकापूर व नांदुरा अशा पाच तालुक्यांसाठी बोदवड परिसर उपसा सिंचन योजना अतिशय महत्वाची आहे. या सिचंन योजनेला १ सप्टेंबर १९९९ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यानंतर ४ सप्टेंबर १९९९ साली सर्व शासकीय मान्यता मिळाल्याने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी ११ जून २०१० रोजी या योजनेच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर निधीअभावी अजूनही सिंचन योजनेचे काम पूर्ण झालेले नाही.

दिंडी मंत्रालयात धडकणार : विशेष म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या माहेर गावी ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र अद्याप ही या सिचंन योजनेच्या कामाला गती मिळाली नसल्याचे दिंडीचे आयोजक अनिल गंगतीरे यांनी माहिती दिली. तसेच ही योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी ४७४ किलो मीटरचा पायी प्रवास करून मंत्रालयात सिचंन योजनेच्या मागणीसाठी आम्ही पायी निघाल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.