ठाणे - शहरातील एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आणि त्याचे कुटुंब कोरोनाबाधित झाले होते. पदाधिकाऱ्यासह त्याची पत्नी आणि लहानग्या मुलीला या विषाणूचा संसर्ग झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. रुग्णालयातील सर्व वैद्यकीय कर्मचारी आणि कुटुंबाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे ते कोरोनामुक्त झाले. यानंतर आज हे कुटुंब जेव्हा त्यांच्या घरी परतले, तेव्हा तेथील रहिवाशांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
स्वागत करणाऱ्या सर्वांचे आभार मानत या पदाधिकाऱ्याने, कोरोनाला न घाबरता जर सरकारी आदेशाचे पालन केले, तर या रोगावर मात करणे शक्य आहे, असे मनोगत व्यक्त केले. या पदाधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची चाचणी करण्यात आली होती. त्यात त्यांचे कुटुंबीय ही बाधित झाल्याचे समोर आले आणि सर्व कुटुंबाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालायत असताना या पदाधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. सर्व नागरिकांना घरात राहून नियमाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.