मीरा भाईंदर (ठाणे) - भाजप नगरसेविका नीला तनेजा सोन्स खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले आहे. जिल्हा जात पडताळणी समितीने सोन्स यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. भाजप नगरसेविका नीला तनेजा सोन्स यांच्यावर गुन्हा करण्याचे आदेश समितीने दिले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर यामुळे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना दिलासा मिळाला आहे.
मीरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर २६ फेब्रुवारी २०२० ला मीरा रोड पोलीस ठाण्यात लैंगिक शोषण, अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित नगरसेविका यांनी आपले लैंगिक शोषण अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. या संदर्भात नरेंद्र मेहता यांची तक्रार भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे केली. मात्र, कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता. आमदार मेहता यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे पोलीस अधीक्षकांकडे देखील तक्रारी केल्या. मात्र, आमदार असल्यामुळे ठोस कारवाई झाली नाही. यानंतर अखेर नीला सोन्स यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात नरेंद्र मेहता यांनी अटकपूर्व जमीन घेऊन बाहेर आहेत.
माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला. त्याची रीतसर तक्रार मी केली होती. त्यांनी सर्व सादर केलेले कागदपत्रे बनावट आहेत, हे मला अगोदर माहीत होते. 10 ऑगस्टला जिल्हा जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. माझ्यावर खोटा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता. लवकरच निर्दोष मुक्तता होईल आणि न्यायलयावर मला पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली. या संदर्भात नगरसेविका नीला सोन्स यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.