ETV Bharat / state

भिवंडीतील प्लास्टिक कारखान्यांवर पर्यावरण मंत्र्यांची कारवाई; हजारो टन प्लास्टिक जप्त - प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना भिवंडी परिसरातून प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सोनाळे औद्योगिक वसाहतीतील १५ पेक्षा जास्त प्लास्टिक पिशव्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली.

प्लास्टिक कारखान्यांची पाहणी करताना पर्यावरण मंत्री रामदास कदम
author img

By

Published : Sep 19, 2019, 8:52 PM IST

ठाणे - पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी राज्यात २४ जून २०१८ पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २ ऑक्टोबरपासून संपूर्ण देशभर प्लास्टिक बंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भिवंडी परिसरात प्लास्टिक पिशव्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर छापा टाकला.

भिवंडीत प्लास्टिक कारखान्यांवर पर्यावरण मंत्र्यांची धाड

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना भिवंडी परिसरातून प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सोनाळे औद्योगिक वसाहतीतील १५ पेक्षा जास्त प्लास्टिक पिशव्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली. या धडक कारवाईमुळे संपूर्ण प्लास्टिक उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र; पाटील, तावडेंसह पंकजा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून आऊट?

कदम हे प्रदूषण नियंत्रण महामंडळातील विश्वासू अधिकाऱ्यांसोबत सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील गुरुदेव कंपाऊंडमध्ये गेले. या ठिकाणच्या प्लास्टिक कंपन्यांना बाहेरून टाळे असल्याचे निदर्शनास आले. कारखान्याच्या आतमध्ये नक्की काय सुरु आहे? याची माहिती मिळत नसल्याने कंपन्यांचे शटर तोडून रामदास कदम यांनी कंपन्यांमध्ये प्रवेश केला. रामदास कदम यांनी संबधित सरकारी अधिकाऱयांना घटनास्थळी बोलवून प्लास्टिक पिशव्या उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा - मुंबई महापालिका कर्मचार्‍यांना यंदाही १५ हजार रुपये बोनस

सिग्नलवर विक्रीस असलेल्या पिशव्यांवर गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथील उत्पादन कंपन्यांची नावे प्रिंट केल्याचे आढळून आले होते. मात्र, या पिशव्यांचे उत्पादन मुंबई लगतच्या भिवंडी येथे सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मला धक्काच बसला आहे. या ठिकाणी हजारो टन प्लास्टिकच्या पिशव्या, कच्चामाल , यंत्रसामुग्री जप्त केली आहे. प्लास्टिक कंपन्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.

दरम्यान, ऐन निवडणूकीच्या तोंडावर पर्यावरण मंत्र्यांची ही कारवाई नक्की कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी २० जुलै २०१७ रोजी केमिकल गोदामांवर धाड टाकून गोदामे सील करण्याचे आदेश दिले होते. मात्र, गोदाम मालक व अधिकाऱ्यांमध्ये गुप्तगू होताच गोदाम सीलची कारवाई बासनात गुंडाळण्यात आली होती. त्यामुळे रामदास कदम यांच्या आजच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Intro:kit 319Body:
भिवंडीत १५ हून अधिक प्लास्टिक पिशवी कंपन्यांवर पर्यावरण मंत्र्यांची धाड ; हजारो टन प्लास्टिक पिशव्या व कच्चामाल जप्त

ठाणे :- पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी राज्यात २४ जून २०१८ पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था,प्रदूषण नियंत्रण महामंडळ आदी शासकीय यंत्रणा प्लास्टिक वापरावर उपाय योजना करण्यात अपयशी ठरली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २ ऑक्टोबरपासून संपूर्ण देशभर प्लास्टिक बंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भिवंडी परिसरातून प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती मिळाल्याने तालुक्यातील सोनाळे औद्योगिक वसाहतीमधील १५ हून अधिक प्लास्टिक पिशव्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर छापा टाकून कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण प्लास्टिक उत्पादकांमध्ये खळबळ उडाली असून आतापर्यतची जिल्ह्यात हि सर्वात मोठी कारवाई झाली आहे.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळातील विश्वासू अधिकाऱ्यांसोबत आपला ताफा भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील गुरुदेव कंपाऊंडमध्ये आज सकाळच्या सुमाराला वळवला असता या ठिकाणच्या असंख्य प्लास्टिक कंपन्यांना बाहेरून टाळे असल्याचे निदर्शनास आले. कारखान्याच्या आतमध्ये नक्की काय सुरु आहे ? याची माहिती मिळत नसल्याने या कंपन्यांचे शटरचे टाळे तोडून मंत्री रामदास कदम व अधिकाऱ्यांनी कंपन्यांमध्ये प्रवेश केला. त्यावेळी तेथील प्लास्टिक पिशवी उत्पादन व कच्चामाल याचा साठा पाहून सर्वच अव्वाक झाले. या प्लास्टिक उत्पादन ठिकाणी कंपनी मालक सकाळच्या वेळी कामावर येणाऱ्या कामगारांना सोबत जेवणाचा डबा घेऊन येण्यास सांगत होते. कामगार एकदा कंपनीमध्ये आल्यास त्या कामगारांना सायंकाळी सहा वाजता सोडले जात होते. त्यामुळे या टाळे लागलेल्या कंपनीच्या शटरच्या आत २४ तास प्लास्टिक पिशव्या उत्पादन सर्रासपणे सुरू असल्याचे उघड झाले आहे.
या कारवाईवेळी मंत्री रामदास कदम यांनी तहसीलदार शशिकांत गायकवाड व तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि. संजय हजारे तसेच ग्रामपंचायत प्रशासन आदींना घटनास्थळी बोलावून या सर्व प्लास्टिक पिशव्या उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर योग्य ती कारवाई करण्याची आदेश दिले. महाराष्ट्रात प्लास्टिक पिशव्या गुजरात तसेच अन्य राज्यातून येतात अशी सर्रास चर्चा सर्वांकडूनच सुरू होती. मात्र बऱ्याच वेळा सिग्नलवर पिशव्या विक्रीस असल्याचे आढळून आले होते. या पिशव्यांवर कधी गुजरात उत्तरप्रदेश , मध्यप्रदेश येथील उत्पादन कंपन्यांची नांवे प्रिंट केल्याचे आढळून आले होते. मात्र या पिशव्यांचे उत्पादन मुंबई लगतच्या भिवंडी येथे सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मला धक्काच बसला आहे. या ठिकाणी हजारो टन प्लास्टिकच्या पिशव्या तसेच हजारो टन कच्चामाल ,यंत्रसामुग्री जप्त केली असून येथील प्लास्टिक कंपन्यांच्या मालकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.

दरम्यान, या सर्व प्लास्टिक कंपन्यांमधून गणपती ,बालाजी ,शिवशक्ती , सरस्वती अशा विविध देवतांच्या नावाने परराज्यातील पत्ते असलेल्या फळांचे तसेच विविध फुलांचे पिशव्यांचे उत्पादन या ठिकाणी सर्रासपणे सुरू असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्यावर नेहमीच थातुरमातुर कारवाई करून प्लास्टिक कंपन्यांना बळ देत होते.मात्र ऐन निवडणूकीच्या तोंडावर पर्यावरण मंत्र्यांची हि कारवाई नक्की कशासाठी ? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.वर्षभरापूर्वी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केमिकल गोदामांवर २० जुलै २०१७ रोजी धाड टाकून गोदाम सील करण्याचे आदेश दिले होते.मात्र त्यावेळी फक्त १९ गोदाम सील केल्यानंतर गोदाम मालक व अधिकाऱ्यांमध्ये गुफ्तगू होताच गोदाम सीलची कारवाई बासनात गुंडाळण्यात आली. त्यामुळे रामदास कदम यांच्या आजच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.