ETV Bharat / state

Death by Suffocation In Thane : ठाण्यात पाण्याची टाकी साफ करताना दोन कामगारांचा मृत्यू, तर दोघांची प्रकृती गंभीर - ठाणे पाण्याच्या टाकीत दोघांचा मृत्यू

ठाण्यातील नौपाडा भागातील मोनालिसा इमारती शेजारी असलेल्या मराठा मंडळ सांस्कृतिक ( Maratha Sanskrutik Mandal Building ) केंद्राच्या इमारतीवरील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी ( Death In Water Tank ) टाकीत उतरलेल्या चार कर्मचाऱ्यांपैकी 2 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर 2 जणांवर खासगी उपचार सुरु असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Death by Suffocation In Thane
Death by Suffocation In Thane
author img

By

Published : Mar 27, 2022, 8:14 PM IST

ठाणे - ठाण्यातील नौपाडा भागातील मोनालिसा इमारती शेजारी असलेल्या मराठा मंडळ सांस्कृतिक ( Maratha Sanskrutik Mandal Building ) केंद्राच्या इमारतीवरील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी ( Death In Water Tank ) टाकीत उतरलेल्या चार कर्मचाऱ्यांपैकी 2 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर 2 जणांवर खासगी उपचार सुरु असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत टाकलेल्या केमिकलचा गॅस तयार झाल्याने चौघंजणं टाकीत गुदमरल्याने ही घटना घडली आहे.

प्रतिक्रिया

श्वास घेण्यास त्रास झाल्याने गुदमरून मृत्यू - नौपाडा भागात असणाऱ्या मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीवरील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी हे कामगार पाण्याच्या टाकीत उतरले होते. या ठिकाणी एकूण चार कामगार काम करत होते. त्यापैकी 2 कामगारानां पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत टाकलेल्या केमिकलमुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने गुदमरून 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. विवेक कुमार आणि योगेश नरवकर, असे मृत कामगारांचे नाव आहे, तर मिथुन कुमार व गणेश नरवणकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोघांना वाचवण्यात पोलिसांना यश - या इमारतीतील पाण्याची टाकी साफ करण्याचं कंत्राट एका ठेकेदाराने घेतलं होतं. त्यासाठी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काम सुरू करण्यात आलं होत. पाण्याची टाकी साफ करत असताना चार ही कामगारांना श्वास घेताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरड केला. त्यानंतर इतर दोन कामगारांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून बचावकार्य सुरु केलं आणि दोन कामगारांना पोलिसांना वाचवण्यात यश आलं. मात्र, दोघांना काढण्यात मोठी अडचण निर्माण होत असल्याने तत्काळ TDRF ची आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर दोघांना बाहेर काढत असताना दोघांचा मृत्यू झाला.

ठेकेदाराचा हलगर्जीपणा - अशा प्रकारची कामं करण्यासाठी अनुभव आणि अत्याधुनिक साहित्यांची आवश्यकता असते. आज ठाण्यात झालेल्या अपघातात दोन्ही बाबींमध्ये कमतरता असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले असून यामुळेच दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. असा प्राथमिक दृष्ट्या पोलिसांना तपासात समोर आले आहे. संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले असून पुढील तपास नौपाडा पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - Swiss Open Super 300 Title: पीव्ही सिंधू थायलंडच्या बुसाननला हरवून पहिल्यांदा ठरली स्विस ओपन चॅम्पियन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.