ठाणे - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी कोणत्याही बंडखोर आमदारांची तसेच त्यांच्या कुटूंबाची सुरक्षा ( Security of rebel MLA ) काढली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे ( Rebel MLA Eknath Shindeb ) यांनी मुख्यमंत्र्यांना ( CM Uddhav Thackeray ) पत्र लिहून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर गृहमंत्र्यांनी माध्यमांना हे स्पष्टीकरण दिले आहे.
-
Rebel Shiv Sena MLA Eknath Shinde writes to CM Uddhav Thackeray, Maharashtra Home Minister, DGP Maharashtra regarding "Malicious withdrawal of security of family members of the 38 MLAs"
— ANI (@ANI) June 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
"The government is responsible for protecting them and their families," he tweets pic.twitter.com/f4riPwx4xM
">Rebel Shiv Sena MLA Eknath Shinde writes to CM Uddhav Thackeray, Maharashtra Home Minister, DGP Maharashtra regarding "Malicious withdrawal of security of family members of the 38 MLAs"
— ANI (@ANI) June 25, 2022
"The government is responsible for protecting them and their families," he tweets pic.twitter.com/f4riPwx4xMRebel Shiv Sena MLA Eknath Shinde writes to CM Uddhav Thackeray, Maharashtra Home Minister, DGP Maharashtra regarding "Malicious withdrawal of security of family members of the 38 MLAs"
— ANI (@ANI) June 25, 2022
"The government is responsible for protecting them and their families," he tweets pic.twitter.com/f4riPwx4xM
ठाण्यातजमावबंदी आदेश - ठाण्यात कालच जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश दिला आहे या आदेशान्वये कोणत्याही पक्ष संघटना यांना आंदोलने निदर्शने करता येणार नाही अशा वेळी आज एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर आवाहन करण्यात आलेला आहे या आवाहनाचा मध्ये त्यांना समर्थन देण्यासाठी कार्यकर्ते शिंदे यांच्या राहत्या बंगल्या जवळ जमा होणार आहे.
तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले - काल शिवसैनिकांनी नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासत आंदोलन केले होते. आता मंत्री तानाजी सावंत यांचे कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले आहे. शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. त्यांनी तानाजी सावंत यांच्या कार्यालयातील टेबल, खुर्च्या, काचांची तावदाने फोडून टाकली आहेत. त्यामुळे या घटनेचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्याता निर्माण झाली आहे. दरम्यान, आज सकाळी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आमदाराच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
शिवसैनिक आक्रमक - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवनेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. कालपासून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख, शिवसैनिकांच्या दोन बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्या. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन केले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता शिवसैनिकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आक्रमक प्रतिक्रिया दिसू लागल्या होत्या. पुण्यामधील तोडफोड ही त्याचीच परिणीती आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( ShivSena rebel leader Eknath Shinde ) यांनी पक्षाचा मोठा गट फोडल्यानंतर आता शिवसैनिक संतप्त झाले आहेत. पुण्यामध्ये शिवसेना ( Shivsena ) नेते आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले आहे. शिवसैनिक त्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा - राऊत म्हणाले आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा नसते, राणा यांची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी